Join us  

Varun Beverages Stock Split : पेप्सिकोच्या फ्रेन्चायझीच्या शेअरमध्ये तेजी, स्टॉक स्प्लिटसाठी एक्स-डेट आज; तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 11:31 AM

Varun Beverages Stock Split : गेल्या काही दिवसांपासून पेप्सिकोची फ्रेन्चायझी असलेल्या वरुण बेवरेजेसचे शेअर फोकसमध्ये आहेत. गुरुवारी कामकाजादरम्यान, वरुण बेव्हरेजेस लिमिटेडच्या शेअरची किमती सुरुवातीच्या व्यवहारात ५ टक्क्यांनी वधारली.

Varun Beverages Stock Split : गेल्या काही दिवसांपासून पेप्सिकोची फ्रेन्चायझी असलेल्या वरुण बेवरेजेसचे शेअर फोकसमध्ये आहेत. गुरुवारी कामकाजादरम्यान, वरुण बेव्हरेजेस लिमिटेडच्या शेअरची किमत (varun beverages share price) सुरुवातीच्या व्यवहारात ५ टक्क्यांनी वधारली. हा शेअर आधीपासूनच फोकसमध्ये होता, कारण आज या शेअर स्प्लिटची एक्स-डेटे आहे. जागतिक स्तरावर पेप्सिकोची दुसरी सर्वात मोठी फ्रँचायझी असलेल्या वरुण बेव्हरेजेस लिमिटेडचे शेअर्स पाच रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअर्समधून दोन रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअर्समध्ये (varun beverages stock split) येतील.

गुरुवारी एनएसईवर वरुण बेव्हरेजेसचा शेअर ६३५.५० रुपयांवर उघडला. यानंतर वरुण बेव्हरेजेसच्या शेअरचा भाव ५ टक्क्यांनी वधारून ६६५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. शेअरमध्ये वाढ होण्यामागचं कारण म्हणजे कंपनीनं केलेली शेअर स्प्लिटची (varun beverages split) घोषणा.

वरुण बेव्हरेजेसनं (varun beverages share) २ सप्टेंबर २०२४ रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, कंपनीच्या संचालक मंडळानं कंपनीच्या विद्यमान इक्विटी शेअर्सच्या सब-डिव्हिजनसाठी किंवा डिव्हिजनसाठी भागधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी गुरुवार, १२ सप्टेंबर २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली होती. ३० ऑगस्ट २०२४ रोजी शेअरहोल्डर्सनं पोस्टल बॅलेटद्वारे मंजूर केलेल्या ५ रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअर्सची २ रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या इक्विटी शेअर्समध्ये विभागणी करण्यासाठी मतदान केलं.

काय म्हणाले एक्सपर्ट?

वरुण बेव्हरेजेस मिरे असेट कॅपिटल मार्केट्सच्या टॉप पिक्समध्ये कायम आहे. वरुण बेव्हरेजेसच्या शेअरची विभाजनापूर्वी टार्गेट प्राईज १,७३४ रुपये ठेवली होती. सध्याच्या शेअरच्या किमतीपेक्षा यात १०% अपेक्षित परताव्याचा अंदाज व्यक्त केला होता. कंपनीनं भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात दमदार कामगिरी दर्शविली असल्याचं मिरे असेटनं सांगितलं.

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसनंही आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर १८५० रुपयांच्या टार्गेट प्राइससह सकारात्मक रेटिंग कायम ठेवलंय. एमओएफएसएलनं प्रामुख्यानं वरुण बेव्हरेजेससाठी कॅलेंडर वर्ष २४, कॅलेंडर वर्ष २५ आणि कॅलेंडर वर्ष २६ चे अंदाज कायम ठेवले होते.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक