Join us  

Vedanta च्या गुंतवणूकदारांसाठी खुशखबर; कंपनी देणार ₹ 7821 कोटींचा लाभांश...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 10:00 PM

Vedanta Dividend : संचालक मंडळाने प्रति शेअर ₹20 लाभांश देण्यास मंजुरी दिली आहे.

Vedanta Dividend : वेदांताच्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी आली आहे. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी तिसरा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील देशातील दिग्गज खाण कंपनी वेदांताने सोमवारी(दि.2) बाजार बंद झाल्यानंतर चालू आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 20 रुपयांच्या तिसऱ्या अंतरिम लाभांशाला मंजुरी दिली. यासह, चालू आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कंपनीने 13,474 कोटी रुपये लाभांश दिला आहे.

सोमवारी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्ससाठी प्रति शेअर 20 रुपये लाभांश जाहीर करण्यात आला आहे. स्टॉक एक्सचेंजमध्ये दिलेल्या माहितीनुसार, यासाठी 10 सप्टेंबर 2024 ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वी मे महिन्यात कंपनीच्या संचालक मंडळाने 11 रुपये प्रति इक्विटी शेअरच्या पहिल्या अंतरिम लाभांशासाठी एकूण 4,089 कोटी रुपये मंजूर केले होते. त्यानंतर, 26 जुलै रोजी 4 रुपये प्रति इक्विटी शेअर (एकूण 1564 कोटी रुपये) दुसरा अंतरिम लाभांश मंजूर करण्यात आला.

गुंतवणूकदारांना एकूण 7,821 कोटी रुपये देणारवेदांता लिमिटेडच्या संचालक मंडळाने 2 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 20 रुपयांच्या तिसऱ्या अंतरिम लाभांशाला मान्यता दिली आहे. कंपनी 20 रुपये प्रति शेअर लाभांशासाठी एकूण 7,821 कोटी रुपये शेअरधारकांना वितरित करेल. विशेष म्हणजे, कंपनीने 2023-24 या आर्थिक वर्षात त्यांच्या भागधारकांसाठी प्रति शेअर 29.5 रुपये लाभांश घोषित केला होता, ज्याची एकूण रक्कम 10966 कोटी रुपये होती.

सोमवारी कंपनीचे शेअर्स घसरणीसह बंद सोमवार, 2 सप्टेंबर रोजी कंपनीचे शेअर्स बीएसई वर 4.95 रुपयांच्या (1.06%) घसरणीसह 463.30 रुपयांवर बंद झाले. आजच्या व्यवहारादरम्यान, कंपनीच्या शेअर्सनी 461.20 रुपयांचा नीचांक आणि 473.20 रुपयांचा उच्चांक गाठला होता. शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 506.85 रुपये आहे. दरम्यान, या लाभांशच्या घोषणेमुळे उद्या या शेअरवर अनेकांची नजर असणार आहे. 

(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक