Vishal Mega Mart IPO :शेअर बाजारात दररोज नवनवीन IPO येत असतात. यातील काही आयपीओंची चर्चा होते, तर काहींची होत नाही. आता शेअर बाजारात एक नवीन आयपीओ येत आहे. सुपरमार्केट क्षेत्रातील मोठं नाव असलेल्या 'विशाल मेगा मार्ट'चा आयपीओ लवकरच शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. या आयपीओची किंमत तब्बल 8000 कोटी रुपये आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा IPO येत्या बुधवारी(11 डिसेंबर) सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 13 डिसेंबरला बंद होईल. हा IPO 10 डिसेंबर रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. हा IPO पूर्णपणे OFS आधारित असेल, म्हणजेच कंपनी या IPO मध्ये कोणतेही नवीन शेअर्स जारी करणार नाही. या IPO अंतर्गत, कंपनीचे प्रवर्तक समायत सर्व्हिसेस LLP आपले सर्व शेअर्स जारी करतील.
समायत सर्व्हिसेस LLP ची 96.55 टक्के हिस्सेदारी
समायत सर्व्हिसेस LLP कडे सध्या गुरुग्रामच्या विशाल मेगा मार्टमध्ये 96.55 टक्के हिस्सा आहे. आता हा IPO पूर्णपणे OFS आधारित आहे, म्हणजे IPO मधून येणारे पैसे विशाल मेगा मार्टला मिळणार नाहीत. कंपनीचे प्रवर्तक समायत सर्व्हिसेस एलएलपीला आयपीओमधून येणारे सर्व पैसे मिळतील. दरम्यान, विशाल मेगा मार्टने जुलैमध्ये सेबीकडे IPO साठी कागदपत्रे सादर केली होती. त्यानंतर सेबीने 25 सप्टेंबर रोजी विशाल मेगा मार्टच्या आयपीओला मंजुरी दिली.
मध्यमवर्गीयांमध्ये विशाल मेगा मार्ट लोकप्रिय
विशाल मेगा मार्टने उच्च वर्गीयांसह मध्यमवर्गीयांमध्ये जबरदस्त पोहोच राखली आहे. विशाल मेगा मार्ट दैनंदिन गरजांसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे वन-स्टॉप डेस्टिनेशन आहे. हे डी-मार्ट प्रमाणेच काम करते. विशाल मेगा मार्टमध्ये इन-हाऊस आणि थर्ड पार्टी ब्रँड्स मिळतात. 30 जून 2024 पर्यंत विशाल मेगा मार्टचे देशभरात एकूण 626 स्टोअर्स कार्यरत आहेत. यासोबतच विशाल मेगा मार्टच्या मोबाइल ॲप आणि वेबसाइटवरूनही ऑनलाइन शॉपिंग करता येणार आहे.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)