शेअर बाजारात गेल्या 4 महिन्यांत ज्या काही कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 100 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे, त्यांत Vodafone Idea च्या शेअरचाही समावेश आहे. या कंपनीचा शेअर शुक्रवारी 14.10 रुपयांच्या पातळीवर ओपन झाला होता. यानंतर, तो काही वेळांतच तो 4 टक्क्यांच्या वाढीसह 14.45 रुपयांवर पोहोचला. ही कंपनीची गेल्या 22 महिन्यांतील सर्वोच्च पातळी आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये तेजीची दोन मुख्य कारणे आहेत. यांपैकी एक म्हणजे, संस्थात्मक खरेदी आणि दुसरे म्हणजे, प्रमोटर्सकडून कंपनीमध्ये गुंतवणुकीची अपेक्षा.
नोव्हेंबरचा महिनाही ठरला जबरदस्त - गेल्या 8 व्यवहाराच्या सत्रांत वोडाफोन आयडियाच्या शेअरच्या किंमतीत 22 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. तर याच दरम्यान सेंसेक्समध्येही 1.2 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. सध्या कंपनीचा शेअर 10 जानेवारी 2022 ची लेव्हल क्रस करण्यात येशस्वी ठरला आहे. महत्वाचे म्हणजे, व्होडाफोन आयडियाच्या पोझिशनल गुंतवणूकदारांना सलग सातव्या महिन्यात पॉझिटिव्ह परतावा बघायला मिळाला आहे.
6 महिन्यांत पैसा डबल -व्होडाफोन आयडियाच्या शेअरच्या किमती गेल्या 6 महिन्यात 100 टक्क्यांहून अधिकची वाढ झाली आहे. Treddlyne डेटानुसार, गेल्या 3 महिन्यांत कंपनीचा शेअर 67 टक्क्यांहून अधिक वधारला आहे. शेअर बाजारात कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 5.70 रुपये एवढा आहे.शुक्रवारी बाजारत बंद होताना व्होडाफोन आयडियाच्या शेअरची किंमत 13.73 रुपये होती. तर मार्केट कॅप 66,837.21 कोटी रुपये होते.(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)