Join us

Vodafone Idea Share Price : ₹२२ वर जाऊ शकतो 'हा' शेअर, सरकारकडे आहेत १६१३ कोटी शेअर्स; एक्सपर्ट्स म्हणाले, "खरेदी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 10:54 AM

Vodafone Idea Share Price: कामकाजादरम्यान कंपनीचा शेअर ४ टक्क्यांनी वधारून १६.५० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. परदेशी ब्रोकरेज फर्म यावर बुलिश दिसून येत आहे.

Vodafone Idea Share Price: टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडिया लिमिटेडचे (Vodafone Idea Ltd) शेअर्स आज फोकसमध्ये आहेत. कामकाजादरम्यान कंपनीचा शेअर ४ टक्क्यांनी वधारून १६.५० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. परदेशी ब्रोकरेज कंपनी सिटीने हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज कंपनीने व्होडाफोन आयडिया लिमिटेड या शेअरवर आपलं 'बाय' रेटिंग कायम ठेवलं असून २२ रुपयांचं टार्गेट प्राइस दिलंय.

शेअर्सच्या या वाढीमागे एक मोठं कारण आहे. टेलिकॉम ऑपरेटरच्या एजीआर क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी करण्यास अखेर सुप्रीम कोर्टानं होकार दिला आहे. हे प्रकरण दीर्घकाळ प्रलंबित असल्यानं सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाकडे महत्त्वपूर्ण घडामोडी म्हणून पाहिलं जात असल्याचे सिटीनं म्हटलं.

यामुळेही येऊ शकते तेजी

एका मीडिया रिपोर्टमध्ये टेलिकॉम कंपनीनं म्हटलंय की, एप्रिल ते जून या कालावधीतील लायसन्स शुल्क आणि स्पेक्ट्रम पेमेंटसह सर्व थकबाकी भरली आहे. व्हीआयएल कर्ज पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करीत असून त्यासाठी बँकांशी चर्चा सुरू असल्याचं सिटीनं यापूर्वी सांगितलं होतं.

शेअर्सची स्थिती काय?

व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये २०२४ मध्ये आतापर्यंत ६ टक्क्यांची घसरण झालीये. परंतु एका वर्षात या शेअरमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी आलीये. १७ एप्रिल २०१५ मघ्ये कंपनीच्या शेअरची किंमत ११८ रुपये होती. दीर्घ कालावधीत कंपनीच्या शेअरनं गुंतवणूकदारांचं ८६ टक्क्यांचं नुकसान केलंय. व्होडाफोन आयडियामध्ये सरकाची २३.१५ टक्के भागीदारी आहे म्हणजेच त्यांच्याकडे १६,१३,३१,८४,८९९ शेअर्स आहेत.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :व्होडाफोन आयडिया (व्ही)शेअर बाजार