Lokmat Money >शेअर बाजार > 92 टक्क्यांनी घसरून ₹9 वर आला हा शेअर, आता खरेदीसाठी तुटून पडले लोक; 15 टक्क्यांनी वाढला भाव

92 टक्क्यांनी घसरून ₹9 वर आला हा शेअर, आता खरेदीसाठी तुटून पडले लोक; 15 टक्क्यांनी वाढला भाव

या कंपनीचे मार्केट कॅप 42,448.69 कोटी रुपये एवढे आहे. कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी कंपनीशी संबंधित एका बातमीमुळे आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 07:27 PM2023-07-26T19:27:27+5:302023-07-26T19:27:43+5:30

या कंपनीचे मार्केट कॅप 42,448.69 कोटी रुपये एवढे आहे. कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी कंपनीशी संबंधित एका बातमीमुळे आली आहे.

vodafone idea share slip 92 percent to ₹9 people rushing to buy The price has increased by 15 percent today | 92 टक्क्यांनी घसरून ₹9 वर आला हा शेअर, आता खरेदीसाठी तुटून पडले लोक; 15 टक्क्यांनी वाढला भाव

92 टक्क्यांनी घसरून ₹9 वर आला हा शेअर, आता खरेदीसाठी तुटून पडले लोक; 15 टक्क्यांनी वाढला भाव

दूरसंचार क्षेत्रातील कंपनी व्होडाफोन-आयडियाच्या शेअर्समध्ये बुधवारी जबरदस्त वाढ बघायला मिळाली. आठवड्याच्या तिसर्‍या व्यवहाराच्या दिवशी हा शेअर जवळपास 13 टक्क्यांच्या उसळीसह 9.07 रुपयांवर पोहोचला. या शेची क्लोजिंग प्राईस 10.10% च्या उसळीसह 8.72 रुपयांवर होती. या कंपनीचे मार्केट कॅप 42,448.69 कोटी रुपये एवढे आहे. कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी कंपनीशी संबंधित एका बातमीमुळे आली आहे. 13 सप्टेंबर 2022 रोजी या शेअरची किंमत 10.08 रुपये होती. हा स्टॉकचा 52 आठवड्यांतील उच्चांक आहे.

असं आहे तेजीचं कारण -
फायनान्शियल एक्सप्रेसने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, अदानी डेटा नेटवर्क आणि व्होडाफोन आयडियाने दूरसंचार विभागाला 5G सेवा लॉन्च करण्यासाठी किमान दायित्व पूर्ण करण्यासाठी मुदत वाढ देण्याची विनंती केली आहे. व्होडाफोन आयडियाच्या मते, निधीच्या कमतरतेमुळे 5G सेवा सुरू होण्यास विलंब होऊ शकतो. व्होडाफोन आयडिया ही एकमेव अशी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी आहे, ज्याने अद्यापपर्यंत 5G सेवा सुरू केलेली नाही. माध्यमांतील वृत्तांनुसार, कंपनी सध्या दिल्ली आणि पुण्या सारख्या शहरांमध्ये आपल्या 5G सेवांची चाचणी घेत आहे.

कंपनीची शेअर प्राईस - 
कंपनीचा शेअर आज 15 टक्क्यांनी वधारला. तर, गेल्या पाच दिवसांत 19.08 टक्के आणि गेल्या एका महिन्यात 20.67 टक्क्यांनी वधारला आहे. या कंपनीचा शेअर गेल्या पाच वर्षांत सुमारे 75 टक्क्यांनी घसरला आहे. 2015 पासून या शेअरमध्ये 92 टक्क्यांची घसरण झाली आहे. या कालावधीत शेअरची किंमत 118 रुपयांवरून सध्याच्या किमतीवर आली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

Web Title: vodafone idea share slip 92 percent to ₹9 people rushing to buy The price has increased by 15 percent today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.