Join us

11 रुपयांच्या शेअरची कमाल, देतोय बम्पर परतावा; गुंतवणूकदार खूश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 1:02 AM

कंपनीचा शेअर शुक्रवारी 6.71 टक्क्यांच्या तेजीसह 11.73 रुपयांवर बंद झाला. 

दिग्गज टेलीकॉम ऑपरेटर व्होडाफोन-आयडिया लिमिटेडच्या (Vodafone Idea) शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात तब्बल 51 टक्क्यांहून अधिकची तेजी आली आहे. आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी अर्थात शुक्रवारी, हा टेल्को स्टॉक 9.63 टक्क्यांच्या उसळीसह 52-आठवड्यांतील उच्चांकी पातळी 11.95 रुपयांवर पोहोचला. अर्थात हा शेअर आपल्या 5.70 रुपये या 52 आठवड्यांच्या निचांकी पातळी पेक्षा 109.65 टक्क्यांनी वधारला आहे. कंपनीचा शेअर शुक्रवारी 6.71 टक्क्यांच्या तेजीसह 11.73 रुपयांवर बंद झाला. 

काय म्हणतात सीईओ -टेल्को ऑपरेटर इक्विटी फंडिंगसंदर्भात नुकतेच चर्चेत आले होते. व्होडाफोन आयडियाचे सीईओ अक्षय मूंदडा यांनी एका अर्निंग कॉलमध्ये म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांत इक्विटी आणि इक्विटी-लिंक्ड दोन्ही साधनांवर गुंतवणूकदारांच्या अनेक गटांसोबत चर्चा झाली आहे. एवढेच नाही, तर आगामी तिमाहीत फंडिंग व्यवस्था पूर्ण होणे अपेक्षित आहे. एकदा असे झाले की, आम्ही आमची गुंतवणूक सुरू ठेवण्यास सक्षम आहोत, असे मुंदडा यांनी म्हटले आहे.

काय म्हणतायत एक्सपर्ट -ब्रोकरेज फर्म टिप्स2ट्रेड्सचे एआर रामचंद्रन यांनी म्हटले आहे की, "कंपनीच्या शेअर्सचा रेसिस्टन्स 11.80 रुपयांच्या जवळपास आहे. सध्याच्या पातळीवर गुंतवणूकदारांनी नफा मिळवायला हवा." महत्वाचे म्हणजे, कंपनीचे एकूण मार्केट कॅप 57,101.28 कोटी रुपये एवढे आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकशेअर बाजार