Vraj Iron and Steel Share : शेअर बाजारात व्रज आयर्न अँड स्टीलची जबरदस्ती एन्ट्री झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) ब्रज आयर्न अँड स्टीलचे शेअर्स सुमारे १६ टक्के प्रीमियमसह २४० रुपयांवर लिस्ट झाले आहेत. कंपनीचे शेअर्स मुंबई शेअर बाजारातही (बीएसई) २४० रुपयांवर लिस्ट झाले. आयपीओमध्ये व्रज आयर्न अँड स्टीलच्या शेअरची किंमत २०७ रुपये होती. २६ जून रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला झालेला आयपीओ २८ जूनपर्यंत खुला होता. व्रज आयर्नची एकूण पब्लिक इश्यू साइज १७१ कोटी रुपये होती.
शेअरला अपर सर्किट
व्रज आयर्न अँड स्टीलचं (Vraj Iron and Steel) लिस्टिंग झाल्यानंतर शेअर्सना अपर सर्किट लागलं. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये कंपनीचे शेअर्स ५ टक्क्यांच्या अपर सर्किटसह २५२ रुपयांवर पोहोचले आहेत. तर मुंबई शेअर बाजारात कंपनीचा शेअर २५१.९५ रुपयांवर पोहोचला. आयपीओमधून जमा झालेला पैसा कंपनी बिलासपूर प्रकल्पातील विस्तार प्रकल्पात वापरणार आहे. तसंच, या निधीचा वापर कर्जाची परतफेड आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूसाठी केला जाईल.
१२६ पटींहून अधिक सबस्क्राईब
व्रज आयर्न अँड स्टीलचा आयपीओ (Vraj Iron IPO) एकूण १२६.३६ पट सबस्क्राईब झाला होता. कंपनीचा रिटेल गुंतवणूकदारांचा कोटा ५८.३ पट सबस्क्राईब झालेला. तर नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा हिस्सा २२१.६६ पट, क्वालिफाईड इन्स्टिट्युशन बायर्सचा हिस्सा १७३.९९ पट सबस्क्राईब झाला होता. रिटेल गुंतवणूकदारांना किमान १ लॉट आणि जास्तीत जास्त १३ लॉटसाठी बोली लावता येणार होती. आयपीओच्या एका लॉटमध्ये ७२ शेअर्स होते.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)