Lokmat Money >शेअर बाजार > पहिल्यांदाच 'ही' कंपनी बोनस शेअर्स देणार, राधाकिशन दमाणींकडे 5000000+ शेअर्स...

पहिल्यांदाच 'ही' कंपनी बोनस शेअर्स देणार, राधाकिशन दमाणींकडे 5000000+ शेअर्स...

VST Industries Share Market : शुक्रवारी हा शेअर 17 टक्के वाढून 4850 रुपयांवर पोहोचला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 05:52 PM2024-07-19T17:52:07+5:302024-07-19T17:53:27+5:30

VST Industries Share Market : शुक्रवारी हा शेअर 17 टक्के वाढून 4850 रुपयांवर पोहोचला.

VST Industries Share Market For The First Time This Company Will Give Bonus Shares, Radhakishen Damani Has More Than 5000000 Shares | पहिल्यांदाच 'ही' कंपनी बोनस शेअर्स देणार, राधाकिशन दमाणींकडे 5000000+ शेअर्स...

पहिल्यांदाच 'ही' कंपनी बोनस शेअर्स देणार, राधाकिशन दमाणींकडे 5000000+ शेअर्स...

VST Industries Share Market : आज(दि.19) शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. पण, अशा परिस्थितीत व्हीएसटी इंडस्ट्रीजच्या (VST Industries) शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 17% पेक्षा जास्त वाढून 4850 रुपयांवर पोहोचले. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये ही तुफानी वाढ एका मोठ्या घोषणेनंतर झाली आहे. कंपनीने त्यांच्या आगामी बोर्ड बैठकीत बोनस शेअर्स जारी करण्याची घोषणा केली आहे. 

राधाकिशन दमाणींकडे 5000000+ शेअर्स
विशेष म्हणजे, भारतातील दिग्गज गुंतवणूकदार आणि डी-मार्टचे प्रमुख राधाकिशन दमाणी (Radhakishan Damani) यांनीदेखील व्हीएसटी इंडस्ट्रीजमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. दमाणी आणि त्यांच्या गुंतवणूक कंपन्यांकडे VST इंडस्ट्रीजचे 5000000 पेक्षा जास्त शेअर्स आहेत. 

25 जुलैच्या बैठकीत बोनस शेअर देण्याचा निर्णय
व्हीएसटी इंडस्ट्रीजचे संचालक मंडळ येत्या 25 जुलै 2024 रोजी होणाऱ्या बैठकीत बोनस शेअर्सच्या मुद्द्यावर विचार करेल. बोनस शेअर्स देण्यास मान्यता मिळाल्यास, व्हीएसटी इंडस्ट्रीज त्यांच्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्याची ही पहिलीच वेळ असेल. व्हीएसटी इंडस्ट्रीजने कधीही स्टॉक स्प्लिट केलेले नाही. पण, कंपनी 2020 पासून त्यांच्या गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 100 रुपयांपेक्षा जास्त लाभांश देत आहे.

दमानी यांच्याकडे 5000000 पेक्षा जास्त शेअर्स 
ज्येष्ठ गुंतवणूकदार राधाकिशन दमाणी आणि त्यांच्या गुंतवणूक संस्थांकडे VST इंडस्ट्रीजचे 5000000 पेक्षा जास्त शेअर्स आहेत. दमाणी यांच्या वैयक्तिक पोर्टफोलिओमध्ये व्हीएसटी इंडस्ट्रीजचे 535185 शेअर्स आहेत. तर, दमाणी यांच्या गुंतवणूक संस्था ब्राइट स्टार इन्व्हेस्टमेंट्स आणि डेरिव्ह ट्रेडिंग अँड रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांचा व्हीएसटी इंडस्ट्रीजमध्ये अनुक्रमे 25.95 टक्के आणि 5.24 टक्के हिस्सा आहे. ब्राइट स्टार इन्व्हेस्टमेंटकडे व्हीएसटी इंडस्ट्रीजचे 4007118 शेअर्स आहेत, तर डेरिव्ह ट्रेडिंग अँड रिसॉर्ट्सकडे व्हीएसटी इंडस्ट्रीजचे 809602 शेअर्स आहेत. 

शेअर्सने एका वर्षात दिला 35% परतावा
गेल्या एका वर्षात व्हीएसटी इंडस्ट्रीजचे शेअर्स 35% वाढले आहेत. 19 जुलै 2023 रोजी कंपनीचे शेअर्स 3597.05 रुपयांवर होते, जे आज 4850 रुपयांवर पोहोचले आहेत. या वर्षी आतापर्यंत व्हीएसटी इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 43% वाढ झाली आहे.

(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.) 

Web Title: VST Industries Share Market For The First Time This Company Will Give Bonus Shares, Radhakishen Damani Has More Than 5000000 Shares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.