Join us

VVIP Infratech IPO: IPO असावा तर असा! लिस्ट होताच गुंतवणूकदार तुटून पडले, पहिल्याच दिवशी १००% चा नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 12:06 PM

VVIP Infratech IPO: कंपनीच्या शेअर्सची मंगळवारी शेअर बाजारात जबरदस्त लिस्टिंग झालं. हे शेअर्स आज बीएसई एसएमईवर ९० टक्के प्रीमियमवर लिस्ट झाले.

VVIP Infratech IPO: व्हीव्हीआयपी इन्फ्राटेकच्या शेअर्सचं मंगळवारी शेअर बाजारात जबरदस्त लिस्टिंग झालं. व्हीव्हीआयपी इन्फ्राटेकचे शेअर्स आज बीएसई एसएमईवर ९० टक्के प्रीमियमवर लिस्ट झाले. कंपनीचा शेअर ९३ रुपयांच्या आयपीओ किंमतीच्या तुलनेत १७६.७० रुपयांवर लिस्ट झाला. लिस्टिंगनंतर तो ५ टक्क्यांच्या वरच्या सर्किटवर पोहोचला आणि शेअर १८५.५३ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. म्हणजेच पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना जवळपास १०० टक्के नफा झाला.

२३ जुलैला झालेला ओपन

व्हीव्हीआयपी इन्फ्राटेकचा आयपीओ मंगळवार, २३ जुलै रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आणि गुरुवार, २५ जुलै रोजी बंद झाला. कंपनीच्या आयपीओला २३६.९२ सब्सक्रिप्शन मिळालं. व्हीव्हीआयपी इन्फ्राटेकने आपल्या आयपीओसाठी प्रति शेअर ९१ ते ९३ रुपये प्राईज बँड निश्चित केली होती. कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू १० रुपये होती. या इश्यूमध्ये किमान १२०० शेअर्ससाठी गुंतवणूक करता येणार होती.

कंपनीचा व्यवसाय

व्हीव्हीआयपी इन्फ्राटेक पायाभूत प्रकल्पांचे नियोजन, विकास आणि बांधकामात सक्रिय आहे. या प्रकल्पांमध्ये पाण्याच्या टाक्या, मलनिस्सारण प्रकल्प, सेक्टर डेव्हलपमेंट, जल जीवन मिशनची कामं, वीज वितरण आणि ३३ केव्हीएपर्यंतच्या उपकेंद्रांचं बांधकाम यांचा समावेश आहे. २०१३ मध्ये कंपनीनं एसबीआर तंत्रज्ञानाचा वापर करून ५६ एमएलडीचे दोन एसटीपी तयार केले होते. 

वैभव त्यागी, विभोर त्यागी आणि प्रवीण त्यागी हे कंपनीचे प्रवर्तक आहेत. शेअर इंडिया कॅपिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही व्हीव्हीआयपी इन्फ्राटेक आयपीओची बुक रनिंग लीड मॅनेजर होते आणि मशितला सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड या ऑफरसाठी रजिस्ट्रार होते.

कुठे खर्च करणार रक्कम?

कंपनी आयपीओच्या उत्पन्नाचा वापर इश्यू खर्च भागविण्यासाठी, वर्किंग कॅपिटलच्या गरजा भागविण्यासाठी, भांडवली खर्चासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट गरजा पूर्ण करण्यासाठी करेल. व्हीव्हीआयपी इन्फ्राटेकचा आयपीओ ६१.२१ कोटी रुपयांचा होता. यामध्ये ६,५८२,००० इक्विटी शेअर्स नव्यानं जारी करण्यात आले आहेत. 

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूक