Stock Order: आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. यामुळेच Waaree Renewable Technologies Limited च्या शेअर्सला 5% चे अप्पर सर्किट लागले. यामुळे या शेअरने रु. 4650.15 चा इंट्राडे उच्चांक गाठला. शेअर्सच्या या वाढीमागे मोठी ऑर्डर आहे. वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीजने सांगितले की, त्यांना 980 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरची किंमत 990.60 कोटी रुपये आहे. हा प्रकल्प 12 महिन्यांत पूर्ण करायचा आहे.
शेअर्सची स्थिती
गेल्या सत्रात सोलर पॅनल मेकर वारीचा स्टॉक 4428.75 रुपयांवर बंद झाला होता. मात्र, आज, 20 फेब्रुवारी 2024 रोजी शेअरने BSE वर रु. 4650.15 चा इंट्राडे उच्चांक गाठला. तर 27 फेब्रुवारी 2023 रोजी स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी रु. 569 वर पोहोचला होता. तसेच, 8 फेब्रुवारी 2024 रोजी या शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक रु. 5145.25 गाठला होता. म्हणजेच, गेल्या एका वर्षात या शेअरमध्ये 645% आणि यावर्षी 112% वाढ झाली आहे.
(टीप- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)