Join us  

शेअर आहे की, पैसे छापण्याची मशीन...₹ 1 लाख गुंतवणारे अवघ्या 5 वर्षात बनले करोडपती!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 2:48 PM

Multibagger Power Stocks : आजच्या ट्रेडिंग सत्रात हा स्टॉक 3.6 टक्क्यांनी वाढला आहे.

Multibagger Power Stocks : पॉवर जनरेशन कंपनी वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड (Waaree Renewable Technologies) साठी एक चांगली बातमी आहे. कंपनीला या आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठी ऑर्डर मिळाली आहे. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला 90.29 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. कंपनी ही ऑर्डर FY24-25 मध्ये पूर्ण करेल. 

ऑर्डर मिळाल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ झाली आहे. आजच्या ट्रेडिंग सत्रात बीएसईवरील स्टॉक 3.6 टक्क्यांनी वाढून 1980 च्या पातळीवर पोहोचला. पण, शेअर बाजार बंद होईपर्यंत ही गती मंदावली आणि शेअर 1.95 टक्क्यांनी वाढून 1948.25 रुपयांवर बंद झाला. 

कंपनीला कसली ऑर्डर मिळाली?कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना 30 मेगावॅट डीसी सौर ऊर्जा प्रकल्पाची ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर 90.29 कोटी रुपयांची आहे. कंपनी ही ऑर्डर FY24-25 मध्ये पूर्ण करेल. विशेष म्हणजे, कंपनीला यापूर्वी, 26 जून 2024 रोजी राजस्थानमध्ये 412.5 मेगावॅटचा सौर प्रकल्प उभारण्याचे कंत्राट मिळाले होते. बिकानेर जिल्ह्यातील कावणी गावात हा प्रकल्प उभारला जाणार आहे.

कंपनीच्या शेअरची कामगिरी

Waaree Renewables च्या शेअर्सने अतिशय कमी वेळेत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअर्सनी केवळ 5 वर्षात गुंतवणूकदारांना 66,620.80 टक्के इतका परतावा दिला आहे. 19 जुलै 2019 रोजी वारी रिन्युएबल्सच्या एका शेअरची किंमत फक्त 2.92 रुपये होती, जी सोमवारी 1980 रुपयांवर पोहोचली.

(टीप: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक