Lokmat Money >शेअर बाजार > शेअर बाजारात जलद आणि अधिक वेळा नफा हवाय? अल्गो ट्रेडिंग आता किरकोळ गुंतवणूकदारांसाठीही होणार सुरू

शेअर बाजारात जलद आणि अधिक वेळा नफा हवाय? अल्गो ट्रेडिंग आता किरकोळ गुंतवणूकदारांसाठीही होणार सुरू

Share Market Algo Trading : आजकाल अनेक जण गुंतवणूकीच्या पारंपारिक पद्धती सोडून शेअर बाजारातील गुंतवणूकीकडे वळत आहेत. जर तुम्ही शेअर बाजारात ट्रेडिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 09:33 IST2024-12-14T09:32:09+5:302024-12-14T09:33:00+5:30

Share Market Algo Trading : आजकाल अनेक जण गुंतवणूकीच्या पारंपारिक पद्धती सोडून शेअर बाजारातील गुंतवणूकीकडे वळत आहेत. जर तुम्ही शेअर बाजारात ट्रेडिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Want to make faster and more frequent profits in the stock market Algo trading may available for retail investors too sebi s plan | शेअर बाजारात जलद आणि अधिक वेळा नफा हवाय? अल्गो ट्रेडिंग आता किरकोळ गुंतवणूकदारांसाठीही होणार सुरू

शेअर बाजारात जलद आणि अधिक वेळा नफा हवाय? अल्गो ट्रेडिंग आता किरकोळ गुंतवणूकदारांसाठीही होणार सुरू

Share Market Algo Trading : आजकाल अनेक जण गुंतवणूकीच्या पारंपारिक पद्धती सोडून शेअर बाजारातीलगुंतवणूकीकडे वळत आहेत. जर तुम्ही शेअर बाजारात ट्रेडिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. छोट्या गुंतवणूकदारांना अल्गो ट्रेडिंगमध्ये सहभागी होणं सोपं झालं पाहिजे, असा प्रस्ताव सेबीनं शुक्रवारी मांडला. सेबीनं आपल्या कन्सल्टेशन पेपरमध्ये सध्याच्या नियमांमध्ये अधिक सुरक्षा उपायांची भर घालून छोट्या गुंतवणूकदारांना अल्गो ट्रेडिंगमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव ठेवलाय. सेबीनं या प्रस्तावांवर ३ डिसेंबरपर्यंत जनतेचे अभिप्राय मागवले आहेत.

अल्गो ट्रेडिंग म्हणजे काय?

अल्गो ट्रेडिंगला ऑटोमेटेड ट्रेडिंग, प्रोग्राम्ड ट्रेडिंग असंही म्हणतात. अल्गो हे नाव अल्गोरिदमवरून आलंय. हे कम्प्युटर प्रोग्रामद्वारे होतं, जे ट्रेड करण्यासाठी सेट केलेल्या सूचनांचे (अल्गोरिदम) पालन करतं. असे मानले जाते की यामुळे अधिक जलद आणि अधिक वेळा नफा मिळू शकतो.

कसं काम करतं?

समजा एखाद्या कंपनीची ५० दिवसांचं मूव्हिंग एव्हरेज २०० दिवसांचं मूव्हिंग एव्हरेज ओलांडल्यावर तुम्हाला कंपनीचे ५० शेअर्स विकत घ्यायचे आहेत. या सूचनेचा वापर करून, कम्प्युटर प्रोग्राम आपोआप शेअरच्या किंमतीवर लक्ष ठेवतो आणि बाईंग ऑर्डर देतो. यामध्ये ट्रेडरला शेअरच्या लाइव्ह किमती आणि आलेखांवर सतत लक्ष ठेवण्याची गरज नसते. तसंच त्याला मॅन्युअली ऑर्डर द्यावी लागत नाही. अल्गोरिदमिक ट्रेडिंग सिस्टम ट्रेडिंग संधी योग्यरित्या ओळखते आणि हे आपोआप करते.

सेबीचं म्हणणं काय?

सेबीच्या म्हणण्यानुसार अल्गो ट्रेडिंगचं बदलतं स्वरूप, विशेषत: छोट्या गुंतवणूकदारांकडून वाढती मागणी पाहता, नियमांमध्ये आणखी बदल आणि सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. लहान गुंतवणूकदारही अल्गो ट्रेडिंगमध्ये योग्य पद्धतीनं सहभागी होऊ शकतील, हा त्याचा उद्देश आहे.

Web Title: Want to make faster and more frequent profits in the stock market Algo trading may available for retail investors too sebi s plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.