Join us  

'बिग बुल' वॉरन बफेंनाही महागात पडला 'Paytm'; वाट पाहून थकले, मोठ्या नुकसानीत शेअर विकले!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 11:29 AM

वॉरन बफे यांनी पेटीएमची (Paytm) मूळ कंपनी–वन ९७ कम्युनिकेशन्समधील आपला संपूर्ण हिस्सा विकला.

जगातील सर्वात मोठे अब्जाधीश गुंतवणूकदार वॉरन बफे यांनी पेटीएमची (Paytm) मूळ कंपनी–वन ९७ कम्युनिकेशन्समधील आपला संपूर्ण हिस्सा विकला. वॉरेन बफे यांच्या कंपनी बर्कशायर हॅथवेनं पाच वर्षांपूर्वी २०१८ मध्ये पेटीएममध्ये २२०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. याद्वारे, बफे यांनी पेटीएममधील २.६ टक्के हिस्सा खरेदी केला. जेव्हा हा करार झाला तेव्हा फिनटेक फर्म पेटीएमचं मूल्यांकन १० अब्ज डॉलरपेक्षा जास्त होतं. तथापि, पेटीएममधील गुंतवणूक ही वॉरेन बफे यांच्यासाठी तोट्याचा सौदा ठरला आणि या कालावधीत त्यांना ६३० कोटी रुपयांचा तोटा झाला.

पेटीएमची मूळ कंपनी - वन ९७ कम्युनिकेशन्सच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार, बर्कशायरनं कंपनीचे १७,०२७,१३० शेअर्स विकत घेतले होते आणि अधिग्रहणासाठी सरासरी किंमत प्रति शेअर १,२७९.७० रुपये होती. यानंतर, बर्कशायरनं २०२१ मध्ये वन ९७ कम्युनिकेशन्सच्या आयपीओमध्ये आपल्या स्टेकचा काही भाग विकला. आता बर्कशायर हॅथवेनं, त्याच्या सहयोगी बीएच इंटरनॅशनल होल्डिंग्सद्वारे, पेटीएममधील १५,६२३,५२९ शेअर्सचे संपूर्ण शेअर्स ८७७.२ रुपये प्रति शेअर या दरानं विकले.बायबॅकनंतर शेअर्सची संख्या वाढलीया वर्षी फेब्रुवारी महिन्यात वन ९७ कम्युनिकेशन्सनं शेअर बायबॅक प्रोग्राम लाँच केला होता. या कार्यक्रमात, कंपनीनं १.५५ कोटी पेक्षा जास्त शेअर्स प्रति शेअर सरासरी ५४६ रुपये या दराने विकत घेतले. सुमारे ८५० कोटी रुपयांचा हा एकूण प्रोग्राम होता. या बायबॅकनंतर, पेटीएमच्या मूळ कंपनीचे शेअर्स ६८ टक्क्यांनी वाढले आहेत आणि २० ऑक्टोबर रोजी २१ महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचलं.

टॅग्स :पे-टीएमशेअर बाजार