Lokmat Money >शेअर बाजार > आम्हाला SME सेगमेंटमध्ये हेराफेरीची चिन्ह दिसतायत, पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न : SEBI चेयरपर्सन

आम्हाला SME सेगमेंटमध्ये हेराफेरीची चिन्ह दिसतायत, पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न : SEBI चेयरपर्सन

सेबीच्या चेअरपर्सन माधबी पुरी बुच यांनी सोमवारी यासंदर्भातील वक्तव्य केलं आणि पुरावे शोधण्याचं काम सुरू असल्याचंही त्या म्हणाल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 03:05 PM2024-03-11T15:05:04+5:302024-03-11T15:05:20+5:30

सेबीच्या चेअरपर्सन माधबी पुरी बुच यांनी सोमवारी यासंदर्भातील वक्तव्य केलं आणि पुरावे शोधण्याचं काम सुरू असल्याचंही त्या म्हणाल्या.

We see signs of manipulation in SME segment efforts to gather evidence SEBI Chairperson madhabi puri buch | आम्हाला SME सेगमेंटमध्ये हेराफेरीची चिन्ह दिसतायत, पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न : SEBI चेयरपर्सन

आम्हाला SME सेगमेंटमध्ये हेराफेरीची चिन्ह दिसतायत, पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न : SEBI चेयरपर्सन

मार्केट रेग्युलेटर सेबीला  (SEBI) आता एसएमई सेगमेंटमध्ये हेराफेरीची चिन्हे दिसू लागली आहेत. सेबीच्या चेअरपर्सन माधबी पुरी बुच (Madhabi Puri Buch) यांनी सोमवारी, ११ मार्च रोजी मुंबईतील महिला फंड मॅनेजर्सच्या सन्मानार्थ AMFI च्या एका कार्यक्रमादरम्यान यावर भाष्य केलं. "आम्हाला एसएमई सेगमेंटमध्ये हेराफेरीची चिन्हं दिसत आहे. बाजारानं आपला फिडबॅक दिलाय. आम्ही कारवाई करण्यासाठी भक्कम पुरावे आणि फिडबॅकवर काम करत आहोत," बुच म्हणाल्या.
 

सेबी काही आयपीओंच्या बाबतीत किंमतीतील फेरफार आणि ट्रेडिंगच्या लेव्हल इत्यादींवर लक्ष ठेवत आहे. एसएमई आयपीओमध्ये सुधारणांच्या सुरुवातीचं पाऊल म्हणून खुलासा लागू करण्यावरही विचार केला जात असल्याचं माधबी पुरी बुच म्हणाल्या. लहान आणि मध्यम उद्योगांना अनेक अटींचं पालन करण्यात अडचणी येतात. अशा परिस्थितीत, बजार नियामकाची इच्छा एक फॅसिलिटेटर बनण्याची एक लिस्टिंग वातावरण बनवण्याची होती, जे मेनबोर्डप्रमाणे नियंत्रित नव्हतं, असंही त्यांनी नमूद केलं.
 

तथापि, काही संस्थांनी या सुविधांच्या फ्रेमवर्कचा गैरवापर केल्याच्या तक्रारी बाजार नियामकाकडे आल्या आहेत. हे कमी करण्यासाठी सेबीनं जे पहिलं पाऊल उचललं. ते अॅडिशनल सर्विलान्स मेजर उपाय आणि ग्रेडेड सर्विलांस मेजर सारखे उपाय लागू करणं होतं, जे यापूर्वी एसएमई बोर्डवर लागू नव्हतं. वास्तविकता अशी आहे की या खूप लहान कंपन्या आहेत, जिथं मार्केट कॅप आणि फ्री फ्लोट लहान आहे, ज्यामुळे आयपीओ स्तरावर आणि ट्रेडिंग स्तरावर दोन्ही हाताळणी करणं खूप सोपं असल्याचंही बुच पुढे म्हणाल्या.

Web Title: We see signs of manipulation in SME segment efforts to gather evidence SEBI Chairperson madhabi puri buch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.