Lokmat Money >शेअर बाजार > 71 कोटींच्या कंपनीला 111 कोटींची सरकारी ऑर्डर, शेअरमध्ये जबरदस्त वाढ

71 कोटींच्या कंपनीला 111 कोटींची सरकारी ऑर्डर, शेअरमध्ये जबरदस्त वाढ

Share Market Tips: मंगळवारचे ट्रेडिंग सत्र सुरू होताच कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 03:23 PM2023-12-19T15:23:42+5:302023-12-19T15:24:04+5:30

Share Market Tips: मंगळवारचे ट्रेडिंग सत्र सुरू होताच कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागले.

We Win Limited Share Price: 111 crore government order for 71 crore company, huge increase in share | 71 कोटींच्या कंपनीला 111 कोटींची सरकारी ऑर्डर, शेअरमध्ये जबरदस्त वाढ

71 कोटींच्या कंपनीला 111 कोटींची सरकारी ऑर्डर, शेअरमध्ये जबरदस्त वाढ

We Win Limited News: मंगळवारचे ट्रेडिंग सत्र सुरू होताच बीपीओ कंपनी, वी विन लिमिटेडच्या (We Win Limited) शेअर्समध्ये वादळी वाढ होऊन अप्पर सर्किटला लागले. मंगळवारी कंपनीच्या शेअर्समध्ये 73.50 रुपयांपर्यंतची वाढ झाली. दरम्यान, वी विन लिमिटेडला सरकारी एजन्सीकडून 111 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे, त्यामुळेच कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. 

वी विनचे ​​मार्केट कॅप सुमारे 71 कोटी रुपये आहे. यानंतर आता 111 कोटी रुपयांची वर्क ऑर्डर मिळाल्याने कंपनीचे गुंतवणूकदारही खूश झाले आहेत. उत्तर प्रदेश डेव्हलपमेंट सिस्टम कॉर्पोरेशन लिमिटेड (UPDESCO) ने मुख्यमंत्री हेल्पलाइनची स्थापना आणि संचालन करण्याची जबाबदारी व्ही विन कंपनीकडे सोपवली आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा कालावधी चार वर्षांचा आहे. भविष्यात दोन वर्षांची मुदतवाढ मिळू शकते. सध्या ऑर्डरची एकूण किंमत 110.61 कोटी रुपये आहे.

स्टॉकमध्ये अप्पर सर्किट
सोमवारी बीएसईवर कंपनीच्या शेअर्समध्ये थोडीशी घसरण दिसून आली, पण आज हा शेअर अपर सर्किटला लागला. राज्य आरोग्य प्राधिकरण, उत्तराखंडने कॉल सेंटर चालवण्यासाठी कंपनीची निवड केल्याच्या काही आठवड्यांनंतर हा आदेश आला आहे. उत्तराखंडमधील दोन वर्षांच्या प्रकल्पाची ऑर्डर 2.14 कोटी रुपयांची आहे.

कंपनीच्या शेअर्सची स्थिती
मंगळवारी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होत असली तरी गेल्या काही काळात या शेअरने चांगली कामगिरी केलेली नाही. गेल्या तीन महिन्यांत हा शेअर 5 टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या एका वर्षात बघितले तर त्यात 21 टक्के वाढ झाली आहे. या शेअरची 52 आठवड्यांची निम्न पातळी 34.50 रुपये आणि उच्च पातळी 109.52 रुपये आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान हा 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 73.50 रुपयांवर पोहोचला.

(टीप: शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला घ्या. लोकमत कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही.)

Web Title: We Win Limited Share Price: 111 crore government order for 71 crore company, huge increase in share

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.