फ्लेक्सिबल वर्कस्पेस प्रोव्हायडर WeWork दिवाळखोर होण्याच्या उंबरठ्यावर आहे. सध्या 47 बिलियन डॉलरची ही कंपनी आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. एवढेच नाही, तर व्यवसायात टिकून हारण्याच्या क्षमतेवरच ठाम नसल्याचे खुद्द कंपनीनेच मान्य केले आहे. या कंपनीचे हेडक्वार्टर न्यूयॉर्कमध्ये आहे. या कंपनीने आपल्या दुसऱ्या तिमाहीत तब्बल 397 मिलियन डॉलरचा शुद्ध घाटा नोंदवला आहे. मात्र, आपल्या भारतातील व्यवसायावर कसल्याही प्रकारचा परिणाम झाला नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.
शेअर आपटले -
गेल्या मंगळवारी तिमाही परिणामांनंतर, WeWork च्या शेअर्समध्ये 30 टक्क्यांहून अधिकची घसरण दिसून आली आहे. गेल्या वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 95 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली आहे. 2023 च्या सुरुवातीपासून WeWork चा स्टॉक 85 टक्क्यांनी खाली आहे. या कंपनीचा शेअर बुधवारी जवळपास एक चतुर्थांशांनी घसरून $0.21 वर आला आहे.
कोरोनानं वाढवलं टेन्शन -
खरे तर WeWork च्या अडटणी कोरोना काळात वाढल्या आहेत. आयपीओच्या माध्यमाने फंड जमवण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांना कोरोनामुळे मोठा झटका बसला. अनेक प्रयत्नांनतरही 2021 मध्ये अत्यंत कमी व्हॅल्यूएशनवर कंपनी अमेरिकेच्या शेअर बाजारात लिस्टेड होण्यात यशस्वी ठरली. मात्र तीने कधीच प्रॉफिट कमावला नाही.
महत्वाचे म्हणजे, WeWork ने सॉफ्टबँक, इनसाइट पार्टनर्स, ब्लॅकरॉक आणि गोल्डमॅन सॅक्स सारख्या गुंतवणूकदारांकडून 22 बिलियन डॉलरहून अधिकचा फंड जमा केला होता. 30 जूनपर्यंत WeWork च्या रिअल इस्टेट पोर्टफोलिओमध्ये 39 देशांत 777 ठिकाणांचा समावेश आहे. जे जवळपास 906,000 वर्कस्टेशन होते.