Join us

नव्या दाव्यांचा काय हाेणार परिणाम? मंदीचे सावट, महागाई, खनिज तेलाचे दर ठरविणार दिशा

By प्रसाद गो.जोशी | Published: August 12, 2024 11:01 AM

जगात मंदी येण्याची भीती व्यक्त होत असतानाच गतसप्ताह निराशाजनक राहिला. सेबीच्या अध्यक्षांवर करण्यात आलेल्या आरोपांमुळे येत्या सप्ताहात बाजारामध्ये संमिश्र वातावरण राहण्याची शक्यता आहे.

जगात मंदी येण्याची भीती व्यक्त होत असतानाच गतसप्ताह निराशाजनक राहिला. सेबीच्या अध्यक्षांवर करण्यात आलेल्या आरोपांमुळे येत्या सप्ताहात बाजारामध्ये संमिश्र वातावरण राहण्याची शक्यता आहे. जाहीर होणारे महागाई निर्देशांक, कंपन्यांचे तिमाही निकाल आणि खनिज तेलाचे दर यावर बाजार अवलंबून असेल.

या सप्ताहामध्ये देशातील तसेच अमेरिकेतील चलनवाढीच्या दराची घोषणा होणार आहे. चलनवाढ जास्त झाल्यास बाजारावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. घसरत असलेल्या खनिजे तेलाच्या दरामुळे मंदीची भीती वाढली आहे.

परकीय वित्तसंस्थांची विक्री सुरूच

  • शेअर बाजारामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून परकीय वित्त संस्था विक्री करीत असल्याचे दिसत आहे. गतसप्ताहात या संस्थांनी १९,१३९. ७६ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आहे. अमेरिकेतील मंदीच्या भीतीने या संस्थांनी पैसे काढून घेतले.
  • परकीय वित्तसंस्थांची विक्री ही बाजाराच्या घसरणीला कारणीभूत ठरू नये, यासाठी देशांतर्गत वित्तसंस्था प्रयत्नशील आहेत. 
  • गतसप्ताहात या संस्थांनी २०,८७१.१० कोटी रुपयांची खरेदी करून बाजाराचा समतोल राखलेला दिसून येतो.
टॅग्स :शेअर बाजार