पुष्कर कुलकर्णीpushkar.kulkarni@lokmat.comFollow : ww.lokmat.com/author/pushkarkulkarni
शेअर बाजारात अनेक कंपन्या लिस्ट आहेत; परंतु सर्वच उत्तम चालतात असे नाही. व्यवसाय नेमका कोणता आणि त्यातील नीतिमत्ता यावर कंपनी चालते आणि अशाच कंपन्यांवर गुंतवणूकदारांचा भरवसा आणि विश्वास असतो. टाटा हे नाव विश्वासाची ओळख दर्शविते असे गुंतवणूकदार म्हणतात. म्हणूनच टाटा समूहाच्या अनेक कंपन्या गेली अनेक वर्षे शेअर बाजारात आपले नाव कमावून आहेत. गुंतवणूकदारांचा ज्यांच्यावर विश्वास आहे अशा अनेक कंपन्या बाजारात लिस्ट आहेत आणि वर्षानुवर्षे व्यवसाय करून गुंतवणूकदारांना मालामाल करीत आहेत. म्हणूनच जिथे विश्वास तिथे संपत्ती असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आज इंग्रजी अक्षर ‘T’ ने सुरू होणाऱ्या तीन उत्तम कंपन्यांविषयी...
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लि. (TCS) आयटी क्षेत्रातील टाटा समूहाची एक अग्रगण्य कंपनी. इंश्युरन्स, बँकिंग, आरोग्य, रिटेल, आदी खासगी आणि शासकीय आस्थापनांना सॉफ्टवेअर आणि त्या अनुषंगिक सेवा प्रदान करणे हा कंपनीचा प्रमुख व्यवसाय आहे. फेस व्हॅल्यू : रुपये १/- प्रतिशेअरसध्याचा भाव : रु. ३३६३/- प्रतिशेअरमार्केट कॅप : रु. १२ लाख ३५ हजार कोटीभाव पातळी : वार्षिक हाय रु. ४०१२/- आणि लो रु. २९२६ /-बोनस शेअर्स : २००६ ते २०११८ दरम्यान तीन वेळा १:१ या प्रमाणात.शेअर स्प्लिट : तीनवेळा केले आहेत.डिव्हिडंड : मागील डिव्हिडंड रक्कम रु. ६७/- प्रति शेअर. उत्तम डिव्हिडंड देणारी कंपनी म्हणून ओळखरिटर्न्स : गेल्या दहा वर्षांत तब्बल पाचपट रिटर्न्स मिळाले आहेत.भविष्यात संधी : आयटी हे कोणत्याही आस्थापनांना आवश्यक असे क्षेत्र आहे. यामुळे कंपनीस उत्तम भविष्य आहे.
टाटा स्टील लि. (TATASTEEL) पायाभूत क्षेत्रातील भारतातील स्टील उद्योग व्यवसायातील एक जुनी कंपनी. टाटा समूहाचे प्रवर्तक स्व. श्री जमशेटजी टाटा यांनी टाटा स्टील अँड आयर्न या कंपनीची सुरुवात केली. स्टील उद्योगातील भारतातील सर्वांत जुनी कंपनी आहे.फेस व्हॅल्यू : रु. १/- प्रति शेअरसध्याचा भाव : रु. १२३/- प्रति शेअरमार्केट कॅप : रुपये १ लाख ५१ हजार कोटीभाव पातळी : वार्षिक हाय रु. १३९/- आणि लो- रु. ८३/-बोनस शेअर्स : १९५९ ते २००४ दरम्यान एकूण पाचवेळा दिला आहे.शेअर स्प्लिट : दोनदा. मूळ फेस व्हॅल्यू १०० होती आता रु. १/- आहे.रिटर्न्स : गेल्या १० वर्षांत ४ पट रिटर्न्स मिळाले आहेत.डिव्हिडंड : मागील डिव्हिडंड रुपये ५१/- प्रति शेअर.भविष्यात संधी : पायाभूत क्षेत्रांत स्टील व्यवसाय मोडतो. स्टीलचे भाव आंतराष्ट्रीय पातळीवर ठरतात. त्यानुसार कंपनीचा नफा वर खाली होत असतो. त्यामुळे या शेअरमधील गुंतवणूक दीर्घ काळासाठी असावी.
टेक महिंद्रा लि. (TECHM)आयटी आणि बीपीओ क्षेत्रातील एक नामवंत कंपनी जी रिटेल, इन्शुरन्स, बँकिंग, ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक यासाठी सॉफ्टवेअर आणि आयटी सेवा प्रदान करते.फेस व्हॅल्यू : ५/- प्रति शेअरसध्याचा भाव : रु. १०४७/- प्रति शेअरमार्केट कॅप : रुपये १ लाख २ हजार हजार कोटीभाव पातळी : वार्षिक हाय रु. १६७६ /- आणि लो - रु. ९४४ /-बोनस शेअर्स : १:१ या प्रमाणात मार्च २०१५ मध्येशेअर स्प्लिट : १:५ या प्रमाणात मार्च २०१५ मध्येरिटर्न्स : गेल्या दहा वर्षांत चार पटींपेक्षा जास्त रिटर्न्स दिले आहेत.डिव्हिडंड : भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.भविष्यात संधी : चांगली. आयटी हे कोर क्षेत्र असल्याने कंपनीस उत्तम भविष्य राहील.
T पासून सुरु हाेणाऱ्या इतर कंपन्यांची नावे : टाटा समूहातील इतर चांगल्या कंपन्या - टाटा पॉवर, टाटा कन्झ्युमर., टाटा केमिकल्स आणि टायटन लि.
टीप : हे सदर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मार्गदर्शक असून, कंपनीच्या भविष्यातील आर्थिक कामगिरीची कोणतीही हमी देत नाही.
पुढील भागात ‘U’ या अक्षराने सुरू होणाऱ्या कंपन्यांविषयी...