Join us

सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 2:53 PM

Stock Market Holiday Lok Sabha 2024: : पुढील आठवड्यात सोमवारी शेअर बाजार बंद राहणार आहे की खुला, हा किरकोळ गुंतवणूकदारांसमोर मोठा प्रश्न आहे. पाहूया शेअर बाजारानं काय म्हटलंय.

Stock Market Holiday: पुढील आठवड्यात सोमवारी शेअर बाजार बंद राहणार आहे की खुला, हा किरकोळ गुंतवणूकदारांसमोर मोठा प्रश्न आहे. सोमवार, २० मे रोजी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज दोन्ही बंद राहतील. मुंबई शेअर बाजारात उपलब्ध कॅलेंडरनुसार लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यामुळे सोमवार, २० मे रोजी शेअर बाजार बंद राहणार आहे. २० मे रोजी शेअर बाजारात व्यवहार होणार नाहीत. या काळात किरकोळ गुंतवणूकदारांना शेअर्सची खरेदी-विक्री करता येणार नाही.

एमसीएक्सचा व्यवहार होणार का?

बीएसई आणि एनएसईप्रमाणेच एमसीएक्सवरही कमोडिटीजचे व्यवहार होतात. सोमवारी म्हणजेच २० मे रोजी एमसीएक्सवर ट्रेडिंग होणार नाही. एमसीएक्स २० मे रोजी बंद राहणार आहे. एमसीएक्स ट्रेडिंग सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत केलं जातं. 

पाचव्या टप्प्यातील मतदान 

२१ मेपासून शेअर बाजारात पुन्हा व्यवहार सुरू होणार आहेत. बीएसईच्या परिपत्रकानुसार २० मे रोजी इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्हआणि सिक्युरिटीज लेंडिंग आणि बॉरोइंग सेगमेंटमध्ये ट्रेडिंग होणार नाही. धुळे, दिंडोरी, नाशिक, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई ईशान्य, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर मध्य आणि पालघर लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी मतदान होणार आहे. तर ४ जून रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.

टॅग्स :शेअर बाजार