Tata Group Stock: टाटा समूहातील कंपनी टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण होण्यामागे विलीनीकरणाची बातमी असल्याचं मानलं जात आहे. ज्यामुळे अनेक बडे अधिकारी कंपनी सोडत आहेत. जोरदार विक्रीमुळे शुक्रवारी एनएसईवर टाटा मोटर्सचा शेअर ६७२.४० रुपयांवर बंद झाला. कंपनीचा इंट्रा-डे नीचांकी स्तर ६७१.१० रुपयांवर आलाय.
टाटा मोटर्सच्या विलीनीकरणाचे प्रकरण काय?
टाटा समूहाच्या कंपनीनं मार्च २०२४ मध्ये विलीनीकरणाची घोषणा केली. कंपनी टॅलेंट मॅपिंग करत आहे. जेणेकरून दोन पैकी एका कंपनीत बड्या अधिकाऱ्यांना जबाबदारी देता येईल. मिंटच्या रिपोर्टनुसार, विलीनीकरणाच्या घोषणेनंतर टाटा मोटर्सनं प्रोफेशनल कंपन्यांना टॅलेंट मॅपिंगची जबाबदारी दिली आहे.
परंतु टाटा मोटर्सचे अनेक अधिकारी या प्रक्रियेवर नाराज आहेत. ज्यामुळे त्यांनी कंपनीही सोडली आहे. "जर तुम्ही दोन्ही व्यवसायांमध्ये मोठ्या पदावर असाल तर तुम्हाला आता एक सोडावे लागेल. आता तुम्हाला एक पद भूषवावं लागेल. यामुळे टीमची साईज लहान होईल,” असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.
विश्वरूम मुखर्जी (एचआर कमर्शियल बिझनेस युनिट), अनुराग मेहरोत्रा (व्हाइस प्रेसिडेंट इंटरनॅशनल बिझनेस अँड स्ट्रॅटेजी), विनय पंत (चीफ मार्केटिंग ऑफिसर - पॅसेंजर), विनय पाठक (हेड ऑफ प्रॉडक्ट प्लॅनिंग अँड प्रोग्राम मॅनेजमेंट) अशा अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या काळात कंपनी सोडली.
टाटा मोटर्सची टार्गेट प्राईज
"टाटा मोटर्सचे शेअर्स ६५९ रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहेत. परंतु त्याच्या विक्रीनं स्थितीवर परिणाम केलाय. ६९५ रुपयांच्या ब्रेकआऊटवर कंपनीचे शेअर ७५० रुपयांच्या लेव्हलपर्यंत जाऊ शकतात," अशी प्रतिक्रिया कंपनीबाबत बोलताना एक्सपर्ट अंशुल जैन यांनी व्यक्त केली.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)