Lokmat Money >शेअर बाजार > कोरियन कंपन्यांना का आकर्षित करतोय भारतीय शेअर बाजार? Hyundai नंतर LG आयपीओ आणण्याच्या विचारात

कोरियन कंपन्यांना का आकर्षित करतोय भारतीय शेअर बाजार? Hyundai नंतर LG आयपीओ आणण्याच्या विचारात

एका अंदाजानुसार ह्युंदाईचा आयपीओ हा देशातील सर्वात मोठा आयपीओ ठरू शकतो. आता आणखी एक कोरियन कंपनी भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या योजनेवर काम करत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 03:03 PM2024-08-28T15:03:33+5:302024-08-28T15:03:53+5:30

एका अंदाजानुसार ह्युंदाईचा आयपीओ हा देशातील सर्वात मोठा आयपीओ ठरू शकतो. आता आणखी एक कोरियन कंपनी भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या योजनेवर काम करत आहे. 

Why is the Indian stock market attracting Korean companies after Hyundai motors india LG IPO might come | कोरियन कंपन्यांना का आकर्षित करतोय भारतीय शेअर बाजार? Hyundai नंतर LG आयपीओ आणण्याच्या विचारात

कोरियन कंपन्यांना का आकर्षित करतोय भारतीय शेअर बाजार? Hyundai नंतर LG आयपीओ आणण्याच्या विचारात

कोरियन कंपन्यांना भारतीय शेअर बाजारात विशेष रस दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी जगातील सर्वात मोठ्या वाहन कंपन्यांपैकी एक असलेल्या ह्युंदाईला आपला आयपीओ भारतीय शेअर बाजारात आणण्यास मंजुरी देण्यात आली होती. एका अंदाजानुसार ह्युंदाईचा आयपीओ हा देशातील सर्वात मोठा आयपीओ ठरू शकतो. आता आणखी एक कोरियन कंपनी भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या योजनेवर काम करत आहे. 

जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनवणारी एलजी देखील आपला आयपीओ शेअर बाजारात आणण्याचा विचार करत आहे. 'दशकांपासून सुरू असलेल्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायाला पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्यासाठी भारतीय बाजारपेठेत पदार्पण हा अनेक पर्यायांपैकी एक आहे,' अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विल्यम चो यांनी ब्लूमबर्गला दिली.

का आकर्षित करतो बाजार?

दक्षिण कोरियाच्या दोन्ही कंपन्या भारताच्या शेअर बाजाराला वाढीसाठी खूप महत्वाचे मानतात. ह्युंदाईला आशा आहे की, कंपनीची लिस्टिंग भारतातील शेअर बाजारात होणार असल्यानं त्यानंतर कंपनीची व्हिजिबिलिटी आणि ब्रँड इमेज दोन्ही वाढेल. यामुळे शेअर्ससाठी लिक्विडिटी आणि पब्लिक मार्केट उपलब्ध होईल. दुसरीकडे, एलजीला वेगानं वाढणाऱ्या शेअर बाजाराचा फायदा घ्यायचा आहे जेणेकरून २०३० पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स महसुलात ७५ बिलियन डॉलर्सचं लक्ष्य साध्य करण्यात मदत होईल.

"आयपीओच्या बाबतीत भारतीय बाजारात काय सुरू आहे हे आम्ही काळजीपूर्वक पाहत आहोत. याशिवाय तत्सम उद्योग आणि कंपन्याही आयपीओच्या प्रकरणांचं अत्यंत काळजीपूर्वक पालन करीत आहेत. एलजीने अद्याप आपल्या भारतीय युनिटच्या संभाव्य मूल्यांकन कॅलक्युलेट केलेलं नाही," असं विल्यम चो यांनी ब्लूमबर्गला सांगितलं.

Web Title: Why is the Indian stock market attracting Korean companies after Hyundai motors india LG IPO might come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.