Join us

Inox Wind Energy: कर्जमुक्त होतेय 'ही' एनर्जी कंपनी, शेअर खरेदीसाठी उड्या; ₹१५२ वर आला भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 12:12 PM

Inox Wind Energy: विंड एनर्जी कंपनी शेअर्स आज फोकसमध्ये आहेत. गुरुवारी हा शेअर ७ टक्क्यांनी वधारून १५२.७० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. त्यानंतर त्यात आणखी वाढ होऊन तो १६० रुपयांच्या वर गेला. 

Wind Energy Share: आयनॉक्स विंड एनर्जी लिमिटेडचे (IWEL) शेअर्स आज फोकसमध्ये आहेत. गुरुवारी हा शेअर ७ टक्क्यांनी वधारून १५२.७० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. त्यानंतर हा शेअर १६० रुपयांच्या वर गेला. शेअर्समधील या तेजीमागे एक चांगली बातमी आहे. विंड एनर्जी सोल्युशन प्रोव्हायडरनं दिलेल्या माहितीनुसार कंपनीचे प्रवर्तक आयनॉक्स विंड एनर्जी लिमिटेडनं कंपनीत ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामुळे कंपनी कर्जमुक्त होण्यास मदत होणार आहे. वर्षभरात हा शेअर २९० टक्क्यांनी वधारला आहे. पाच वर्षांत हा शेअर ९०० टक्क्यांनी वधारलाय. 

काय आहेत डिटेल्स?

आयनॉक्स विंड एनर्जीद्वारे २८ मे २०२४ ला स्टॉक एक्सचेंजवर ब्लॉक डीलच्या माध्यमातून आयनॉक्स विंड लिमिटेडचे इक्विटी शेअर्सची विक्रीद्वारे फंड जमा केला होता. मे २०२४ मध्ये जवळ २.७५ कोटी शेअर्स किंवा कंपनीच्या एकूण इक्विटीच्या ५ टक्के एक ब्लॉक डीलमध्ये बदलण्यात आले होते. हे शेअर्स १५१ रुपये प्रति शेअरवर बदलण्यात आले होते. यामुळे याचं एकूण मूल्य ४०० कोटींपेक्षा अधिक झालं.

कर्जमुक्त होणार कंपनी

आयनॉक्स विंड ही भारतातील आघाडीची विंड एनर्जी सोल्यूशन्स प्रोव्हायडर आहे, तर आयनॉक्स विंड एनर्जी लिमिटेड (आयडब्ल्यूईएल) आयनॉक्स विंड लिमिटेडच्या प्रवर्तकांपैकी एक आहे. जमा झालेल्या निधीचा वापर आयनॉक्स विंडचे कर्ज कमी करण्यासाठी आणि कंपनीच्या कार्यशील भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला जाईल. यामुळे कंपनीचा ताळेबंद मजबूत होईल. आयनॉक्स विंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास ताराचंदानी यांनी या गुंतवणुकीमुळे कंपनी निव्वळ कर्जमुक्त होण्यास, ताळेबंद मजबूत होण्यास आणि विकासाला गती देण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया दिली.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक