Lokmat Money >शेअर बाजार > IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर

IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर

Winsol Engineers IPO:  रिन्यूएबल एनर्जी कंपनीचा आयपीओ मंगळवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग उत्कृष्ट झाली. पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 11:29 AM2024-05-14T11:29:02+5:302024-05-14T11:29:17+5:30

Winsol Engineers IPO:  रिन्यूएबल एनर्जी कंपनीचा आयपीओ मंगळवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग उत्कृष्ट झाली. पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल झाले.

Winsol Engineers IPO Listed at a premium of 386 percent from rs 75 to rs 365 on the first day share market investment | IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर

IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर

Winsol Engineers IPO:  विनसोल इंजिनिअर्सचा आयपीओ मंगळवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग उत्कृष्ट झाली. या रिन्यूएबल एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये पहिल्या दिवशी ३८६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. एनएसईवर विनसोल इंजिनिअर्सचा शेअर ३८६ टक्के प्रीमियमसह ३६५ रुपयांवर लिस्ट झाला. आयपीओमध्ये याची किंमत ७५ रुपये निश्चित करण्यात आली होती.
 

उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
 

या आयपीओला पहिल्या दिवसापासूनच गुंतवणूकदारांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत होता. गुंतवणूकदारांनी तीन दिवसांत ४६.८६ कोटी इक्विटी शेअर्सची खरेदी केली, जे २२.३२ लाख इक्विटी शेअर्सच्या ऑफर साईजपेक्षा २०९.९८ पट जास्त होते. किरकोळ गुंतवणूकदारांनी या इश्यूला सर्वाधिक पसंती दिली. किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा आपल्या राखीव कोट्यापेक्षा ३५७.४ पट अधिक सबस्क्राइब झाला. नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सनं वाटप केलेल्या कोट्यापेक्षा २००.६६ पट बोली लावली, तर क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सनं त्यांच्यासाठी निर्धारित केलेल्या भागापेक्षा १६.५ पट अधिक बोली लावली.
 

६ मे रोजी इश्यू झाला ओपन
 

६ मे रोजी हा इश्यू सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला. गुंतवणूकदारांना ९ मेपर्यंत यासाठी अर्ज करता येणार होता. रिन्यूएबल एनर्जी उद्योगाला सेवा देणाऱ्या विनसोल या कंपनीनं आपल्या इश्यूचा प्राइस बँड ७१ ते ७५ रुपये प्रति शेअर निश्चित केला होता. जामनगर स्थित इंजिनीअरिंग, खरेदी, बांधकाम आणि कमिशनिंग कंपनी पवन आणि सौर ऊर्जा निर्मिती कंपन्यांसाठी प्लांट बॅलन्स (बीओपी) सोल्यूशन्स प्रदान करते.
 

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

 

Web Title: Winsol Engineers IPO Listed at a premium of 386 percent from rs 75 to rs 365 on the first day share market investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.