Join us

Wipro Bonus Shares : १४ व्यांदा बोनस शेअर देणार 'ही' दिग्गज कंपनी, ५ डिसेंबर पूर्वी रेकॉर्ड डेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 13:23 IST

Wipro Bonus Shares : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनीनं बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. कंपनीनं शेअर बाजारांना या रेकॉर्ड डेटची माहिती दिलीये.

Wipro Bonus Shares : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रो लिमिटेडनं (Wipro Limited) बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. कंपनीनं शेअर बाजारांना या रेकॉर्ड डेटची माहिती दिलीये. विप्रो चौदाव्यांदा बोनस शेअर्स देणार आहे. यानंतर विप्रोचे शेअर्स फोकसमध्ये आहेत.कंपनीने शेअर बाजारांना दिलेल्या माहितीनुसार एकास एक शेअर बोनस म्हणून देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. या बोनस शेअरसाठी कंपनीने ३ डिसेंबर २०२४, मंगळवार ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. काल म्हणजेच २१ नोव्हेंबर रोजी कंपनीकडून रेकॉर्ड डेट जाहीर करण्यात आली आहे.

१३ वेळा दिलेत बोनस शेअर्स

आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रो लिमिटेडनं १३ वेळा बोनस शेअर्स दिले आहेत. १९७१ मध्ये पहिल्यांदा कंपनीने बोनस शेअर्स दिले. १९८१, १९८५, १९८७, १९८९, १९९२, १९९५, १९९७, २००४, २००५, २०१०, २०१७ आणि २०१९ मध्ये बोनस शेअर्स दिले होते.बीएसईच्या आकडेवारीनुसार, कंपनीनं २०१० मध्ये ३ शेअर्ससाठी २ शेअर्सचा बोनस दिला होता. २०१७ मध्ये कंपनीने प्रति शेअर १ शेअर बोनस दिला होता. तर २०१९ मध्ये विप्रो लिमिटेडनं ३ शेअर्ससाठी १ शेअरचा बोनस दिला होता.

वर्षभरात कामगिरी कशी?

गुरुवारी कंपनीचा शेअर ०.७९ टक्क्यांनी घसरून ५५७.२० रुपयांवर बंद झाला. गेल्या ६ महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत २०.९१ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर विप्रो लिमिटेडच्या शेअरच्या किंमतीत वर्षभरात ३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विप्रो लिमिटेडचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ५८३ रुपये आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ३९३.२० रुपये आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकविप्रो