F&O Trading : शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. योग्य जोखीम पत्करुन इथं अनेकजण काही तासांत लखपती ते कोट्याधीश झालेत. तर क्षणात राजाचा भिकारी झाल्याचीही उदाहरणे आहेत. शेअर बाजारात पैसे मिळवण्यासाठी नवीन गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सची संख्या सातत्याने वाढत आहे. विशेष म्हणजे या शर्यतीत महिलाही मागे नाहीत. भारतीय शेअर बाजारात सक्रिय महिला ट्रेडर्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. नुकत्याच एका अहवालातून महिला ट्रेडर्सबद्दल समोर आलेली माहिती आश्चर्यकारक आहे.
एका अहवालानुसार, शेअर बाजारातून नफा कमावण्याच्या बाबतीत मुली मुलांपेक्षा जास्त हुशार आहेत. तर बहुतेक मुले शेअर बाजारात आपले पैसे गमावत असल्याचे समोर आलंय.
मुलांपेक्षा मुली सरसशेअर बाजार नियमाक प्राधिकरण सेबीने नुकताच एक अभ्यास अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये एका वर्षात कुठल्याप्रकारच्या ट्रेडर्सने पैसे गमावले तर कुणाला अधिक नफा झाला, याचा माहिती देण्यात आली आहे. साहजिकच कमी भांडवल असलेले ट्रेडर्स ऑप्शन खरेदी करुन रात्रीत कोट्यधीश होण्याचं स्वप्न पाहतात. यामध्ये नफा कमावणारे भरपूर भांडवल असणारे परदेशी गुंतवणूकदार आणि ऑपरेटर आहेत. पण सेबीच्या या अहवालातून आणखी एक सत्य समोर आले आहे. शेअर बाजारात आणि विशेषतः डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगमध्ये मुली मुलांपेक्षा जास्त हुशार असल्याचे सिद्ध झाले आहे. कारण, पुरुषांच्या तुलनेत मुलींचे कमी नुकसान झाले होते.
फ्युचर्स अँड ऑप्शन्स म्हणजेच F&O ट्रेडिंगवर सेबीने आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार या प्रकारच्या ट्रेडींगमध्ये महिलांचा सहभाग वाढला आहे. यामध्ये पुरुषांपेक्षा महिलांनी चांगली कामगिरी केली आहे. स्वतःतील शहाणपण आणि दूरदर्शीपणामुळे महिलांचा पुरुषांपेक्षा कमी लॉस झाला आहे.
महिलांचे कमी नुकसानF&O ट्रेडिंगमधील महिलांचा सहभाग २०२१-२२ आर्थिक वर्षातील १४.९% वरून २०२३-२४ मध्ये १३.७% पर्यंत घसरला आहे. तरीही स्त्रियांना तुलनेने कमी नुकसान सहन करावे लागले. SEBI च्या अहवालानुसार, २०२३-२४ मध्ये, F&O ट्रेडिंगमध्ये ९१.९% पुरुषांचे नुकसान झाले, तर केवळ ८६.३% महिलांचे नुकसान झाले. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर केवळ ८.१ टक्के पुरुषांनी नफा कमावला, तर सुमारे १४ टक्के महिलांनी पैसे कमावले. महिला ट्रेडर्सने सरासरी ७५,९७३ रुपयांचा तोटा नोंदवला, जो पुरुष ट्रेडर्सच्या ८८,८०४ रुपयांच्या सरासरी तोट्यापेक्षा कमी आहे. या अहवालाने सिद्ध होतंय की बाजारातील चढ-उतारांमध्ये महिला अधिक हुशारीने काम करतात.
फ्युचर आणि ऑप्शन करणाऱ्यांना सेबीचा इशाराया अहवालातून सेबीने फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंगचं धक्कादायक वास्तव समोर आणलं आहे. ट्रेडिंग करणाऱ्या १० पैकी ९ जणांनी पैसे गमावल्याचा निष्कर्ष यातून समोर आला आहे. गेल्या तीन वर्षांत F&O ट्रेडर्सने १.८ लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान सहन केलं आहे.