लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : मागील काही काळापासून शेअर बाजारात प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावांची (आयपीओ) मोठी रांग लागलेली दिसत आहे. अशा स्थितीत आयपीओंची संख्या अचानक नेमकी कशामुळे वाढली आहे, तसेच आयपीओमध्ये गुंतवणूक करताना काय काळजी घेणे आवश्यक, कोणता आयपीओ निवडावा हे जाणून घेणे गरजेचे बनले आहे. केवळ लिस्टिंग गेनच्या लालसेने आयपीओमध्ये पैसे लावणे ही घातक रणनीती आहे.
बजाज फायनान्सचा आयपीओ ११४ टक्के बंपर लिस्टिंग झाला, त्यामुळे आयपीओकडे लोकांचा ओढा वाढला. केआरएन हिट अँड एक्स्चेंजरचा आयपीओसुद्धा १२० टक्क्यांपर्यंत लिस्टिंग लाभ देण्याचे संकेत मिळत आहेत. यापुढे स्विगी, हुंदाई आणि एनटीपीसी ग्रीन एनर्जी यासारखे काही मोठे मेन बोर्ड आयपीओ रांगेत आहेत. एसएमई आयपीओंची संख्याही वाढत आहे.
का वाढले आयपीओ?सध्या बाजारात तेजी आहे. त्याचा लाभ उठविण्यासाठी कंपन्या आयपीओ आणण्यास धडपडत आहेत. बाजारात ‘बुल रन’ असेल तेव्हा जास्तीत जास्त आयपीओ येतच असतात. जगभरच्या बाजारांचा हा स्थायीभाव आहे.
काय काळजी घ्यावी?nकंपनीची माहिती जाणून घ्या.nवृद्धीच्या शक्यता जाणून घ्या.nकंपनीचा एकूण महसूल, नफा, कर्ज, रोख प्रवाह जाणून घ्या. nकंपनीच्या समभागाच्या किमतीचे मूल्यांकन किती आहे, हे पाहा. nब्रोकरेजचा कंपनीबाबतचा अहवाल वाचा. त्यांचे मत समजून घ्या.nगुंतवणुकीपूर्वी वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या.