Lokmat Money >शेअर बाजार > बुलेट स्पीडनं धावतायत Yes Bank चे शेअर्स; ४ दिवसांच ४०% टक्क्यांची तेजी,  SBI चं मोठं वक्तव्य

बुलेट स्पीडनं धावतायत Yes Bank चे शेअर्स; ४ दिवसांच ४०% टक्क्यांची तेजी,  SBI चं मोठं वक्तव्य

गेल्या काही दिवसांपासून येस बँकेचे शेअर्स फोकसमध्ये आहेत. येस बँकेच्या शेअर्समध्ये सध्या प्रचंड वाढ दिसून येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 11:47 AM2024-02-09T11:47:42+5:302024-02-09T11:48:23+5:30

गेल्या काही दिवसांपासून येस बँकेचे शेअर्स फोकसमध्ये आहेत. येस बँकेच्या शेअर्समध्ये सध्या प्रचंड वाढ दिसून येत आहे.

Yes Bank shares run at bullet speed 40 percent increase in 4 days SBI s big statement main cause | बुलेट स्पीडनं धावतायत Yes Bank चे शेअर्स; ४ दिवसांच ४०% टक्क्यांची तेजी,  SBI चं मोठं वक्तव्य

बुलेट स्पीडनं धावतायत Yes Bank चे शेअर्स; ४ दिवसांच ४०% टक्क्यांची तेजी,  SBI चं मोठं वक्तव्य

गेल्या काही दिवसांपासून येस बँकेचे शेअर्स फोकसमध्ये आहेत. येस बँकेच्या शेअर्समध्ये सध्या प्रचंड वाढ दिसून येत आहे. येस बँकेचे शेअर्स शुक्रवारी कामकाजादरम्यान 9 टक्क्यांनी वाढून 32.81 रुपयांवर पोहोचले. बँकेच्या शेअर्समध्ये सलग चौथ्या दिवशी जोरदार वाढ झाली. 
 

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) निवेदनानंतर येस बँकेच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली. एसबीआय ब्लॉक डीलद्वारे येस बँकेचे 5000-6000 कोटी रुपयांचे शेअर्स विकू शकते अशी बातमी समोर आली होती. एसबीआयनं हे वृत्त फेटाळून लावलंय. बँकेनं म्हटलंय की शेअर्स विकण्याशी संबंधित हे वृत्त वस्तुतः चुकीचं आहे.
 

4 दिवसांत 40 टक्क्यांची तेजी
 

गेल्या काही दिवसांत खाजगी क्षेत्रातील येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. येस बँकेचे शेअर्स गेल्या 4 दिवसात 40 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. 5 फेब्रुवारी रोजी बँकेचे शेअर्स 22.82 रुपयांवर बंद झाले होते. येस बँकेचे शेअर्स 9 फेब्रुवारी 2024 रोजी 32.81 रुपयांवर पोहोचले आहेत. बँक शेअर्सनं शुक्रवारी 52 आठवड्यांचा नवा उच्चांकी स्तर गाठला. येस बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 14.10 रुपये आहे.
 

2 वर्षांत 130% टक्क्यांपेक्षा जास्त वाढ
 

गेल्या 2 वर्षात येस बँकेच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांत बँकेच्या शेअर्समध्ये 130 टक्क्यां पेक्षा जास्त वाढ झाली आहे. 11 फेब्रुवारी 2022 रोजी बँकेचे शेअर्स 13.92 रुपयांवर होते. येस बँकेचे शेअर्स 9 फेब्रुवारी 2024 रोजी 32.81 रुपयांवर पोहोचले आहेत.


गेल्या एका वर्षात येस बँकेच्या शेअर्समध्ये 90 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. 9 फेब्रुवारी 2023 रोजी बँकेचे शेअर्स 16.85 रुपयांवर होते. येस बँकेचे शेअर्स 9 फेब्रुवारी 2024 रोजी 32.81 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या 3 महिन्यांतही येस बँकेच्या शेअर्समध्ये 90 टक्क्यांहून अधिक वाढ झाली.  
 

(टीप - यामध्ये शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Yes Bank shares run at bullet speed 40 percent increase in 4 days SBI s big statement main cause

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.