Lokmat Money >शेअर बाजार > ड्रोन बनवणाऱ्या कंपनीचा शेअर बनलाय रॉकेट, तीन वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल

ड्रोन बनवणाऱ्या कंपनीचा शेअर बनलाय रॉकेट, तीन वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल

गुरुवारी झेन टेकच्या (Zen Tech) शेअरची किंमत 911.40 रुपयांच्या इंट्रा-डे हायवर पोहोचला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 06:19 PM2023-08-17T18:19:47+5:302023-08-17T18:22:44+5:30

गुरुवारी झेन टेकच्या (Zen Tech) शेअरची किंमत 911.40 रुपयांच्या इंट्रा-डे हायवर पोहोचला होता.

zen tech share has become a Rocket has made investors rich in three years | ड्रोन बनवणाऱ्या कंपनीचा शेअर बनलाय रॉकेट, तीन वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल

ड्रोन बनवणाऱ्या कंपनीचा शेअर बनलाय रॉकेट, तीन वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल

ड्रोन तयार करणाऱ्या झेन टेकच्या शेअरच्या किमतीत गेल्या 3 वर्षात अभूतपूर्व वाढ झाली आहे. मार्च 2020 मध्ये, झेन टेक शेअरची किंमत 30 रुपये होती. जो मार्च दरम्यान 90 रुपयांवर पोहोचला. मात्र या स्टॉकच्या तेजीला ब्रेक लागला नाही. तो पुढच्या काळात 90 रुपयांवरून 900 रुपयांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरला. आज या शेअरची किंमत 849.90 रुपये एवढी आहे.

तिमाही परिणाम -
गुरुवारी झेन टेकच्या (Zen Tech) शेअरची किंमत 911.40 रुपयांच्या इंट्रा-डे हायवर पोहोचला होता. कंपनीच्य शेअरच्या किंमतीत तिमाही परिणाम आल्यानंतर, तुफान तेजी दिसत आहे. यानंतर शेअरची मागणी पूर्वीच्या तुलनेत वाढली आहे.

असे आहेत तिमाही परिणाम - 
झेन टेक्नोलॉजीजचे (Zen Tech Q1 Result 2023) प्रदर्शन पूर्वीच्या तुलनेत अधिक चांगले राहिली आहे. चालू आर्थिक वर्षात कंपनीचा रेव्हेन्यू 132.47 कोटी रुपये होता. याच तिमाहीत गेल्यावर्षी कंपनीचा रेव्हेन्यू 37.07 कोटी रुपये होता. वार्षिक आधाराचा विचार करता, यात 257 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. जानेवारी ते मार्च तिमाही दरम्यान झेन टेक्नॉलॉजीजचा नेट प्रॉफिट 20.19 कोटी रुपये एवढा आहे.

या वर्षात आतापर्यंत या शेअरच्या किंमतीत 375 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. तर गेल्या 6 महिन्यांपूर्वी गुंतवणूक करणाऱ्या आणि ती काय ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना 280 टक्क्यांचा फायदा झाला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: zen tech share has become a Rocket has made investors rich in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.