शेअर बाजारमधील संरक्षण क्षेत्रातील कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना केवळ तीन दिवसांतच तब्बल 50 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. एकेकाळी 50 रुपयांवर व्यवहार करणाऱ्या या शेअरने आज 500 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
झेन टेक्नॉलॉजीजच्या (Zen Technologies) या शेअरने गेल्या तीन वर्षांत 1038 टक्क्यांची उसळी घेतली आहे. 13 जुलै 2020 रोजी या कंपनीच्या एका शेअरची किंमत जवळपास 57 रुपये एवढी होती. ती आता 590 रुपयांवर पोहोचली आहे. या शेअरमध्ये आजही तेजी बघायला मिळत आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने तीन वर्षांपूर्वी झेन टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याला आज 11 लाख रुपयांपेक्षा जास्त परतावा मिळाला असता. कंपनीचे मार्केट कॅप 4681.95 कोटी रुपये एवढे आहे.
केंद्र सरकारकडून झेन टेक्नॉलॉजीजला नुकतीच 160 कोटी रुपयांची ऑर्ड मिळाली आहे. या मोठ्या ऑर्डर्सच्या पार्श्वभूमीवर, झेन टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सने गेल्या काही दिवसांत 40 टक्क्यांचा बम्पर परतावा दिला आहे. कंपनीला निर्यात बाजारातून 340 कोटी रुपयांची ऑर्डरही मिळाली आहेत. तेव्हापासून कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसून येत आहे.
सरकारकडून मिळालेल्या 160 कोटी रुपयांच्या ऑर्डरसंदर्भात माहिती देताना कंपनीने सांगितले की, या ऑर्डर्स संरक्षण मंत्रालयाकडून एंट्री-ड्रोन सिस्टिमच्या पुरवठ्यासंदर्भात आहेत. कंपनीला हा करार एका वर्षात पूर्ण करायचा आहे. महत्वाचे म्हणजे, हा शेअर एका महिन्यात 51 टक्क्यांनी वधारला आहे. तर, 6 महिन्यांचा परतावा 225 टक्के, म्हणजेच तीन पटीने वाढला आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)