Join us  

Zerodha Nithin Kamath : ब्रोकर्स कधीही करू शकणार नाही 'हे' काम, SEBI च्या नव्या नियमांवर काय म्हणाले नितीन कामथ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 11:19 AM

Zerodha's View on SEBI's New Direct Payout Rule: झिरोदाचे नितीन कामथ यांनी सेबीच्या नव्या नियमांवर आपलं मत व्यक्त केलं आहे. पाहा काय म्हणाले नितीन कामथ?

Zerodha's View on SEBI's New Direct Payout Rule:  शेअर्सच्या खरेदी-विक्रीच्या हिशेब त्वरित करण्याची प्रणाली या महिन्यात १४ ऑक्टोबरपासून लागू होणार होती, पण सेबीनं आता त्याची मुदत पुढे ढकलली आहे. आता पुढील महिन्यात ११ नोव्हेंबरपासून हा नियम लागू होणार आहे. या नव्या नियमाविषयी दिग्गज ब्रोकरेज फर्म झिरोधाचे सहसंस्थापक नितीन कामत यांनी आपलं मत व्यक्त केलंय. या बदलामुळे शेअर्सच्या हस्तांतरणात ब्रोकर्सची भूमिका बऱ्याच अंशी कमी होईल आणि यंत्रणेत पारदर्शकता वाढेल, असं ते म्हणाले. 

नितीन कामत यांनी याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपलं मत व्यक्त केलं. शेअर्सच्या हस्तांतरणात खूप जोखीम असते पण सेबीचा नवा नियम लागू झाल्यावर ती बऱ्याच अंशी कमी होणार असल्याचं कामथ म्हणाले.

काय आहे डायरेक्ट पेआऊट नियम?

बाजार नियामक सेबीनं गुरुवारी, ग्राहकांच्या डीमॅट खात्यांमधून सिक्युरिटीच्या थेट पे-आऊटसेबंधीच्या गाईडलाईन्स लागू करण्याची डेडलाईन वाढून ११ नोव्हेंबर केली आहे. यापूर्वी हा नियम १४ ऑक्टोबरपासून लागू होणार होता. डायरेक्ट पेआऊट सिस्टीमअंतर्गत क्लिअरिंग कॉर्पोरेशन (सीसी) थेट गुंतवणूकदारांच्या खात्यात सिक्युरिटीज ट्रान्सफर करतात; ही नवी प्रणाली अद्याप लागू झालेली नाही.

५ जून रोजी परिपत्रक

५ जून रोजी सेबीने एक परिपत्रक जारी केलं होतं, ज्यात क्लिअरिंग कॉर्पोरेशनला (सीसी) ऑफिशिअल एफिशिअन्सी सुधारण्यासाठी आणि जोखीम कमी करण्यासाठी पेमेंट सिक्युरिटी थेट ग्राहकांच्या डिमॅट खात्यात जमा करणं आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. सध्या क्लिअरिंग कॉर्पोरेशन सिक्युरिटीचं पेआऊट ब्रोकरच्या पूल अकाऊंटमध्ये क्रेडिट करतं आणि नंतर संबंधित ग्राहकांच्या डीमॅट अकाऊंटमध्ये क्रेडिट केलं जातं.

काय आहेत गाईडलाईन्स?

पेआऊटची वेळ दुपारी १.३० वरून ३.३० करण्यात आली आहे, ज्यामुळे एक्सचेंजकडून पेमेंट केल्यानंतर एका दिवसाऐवजी त्याच दिवशी सिक्युरिटीज ग्राहकांच्या खात्यात जमा होतील. सीसीकडून ५ ऑगस्टपर्यंत अंतिम ऑपरेशनल मार्गदर्शक तत्त्वे बाजाराला जारी करायची होती. तथापि, ब्रोकर्स इंडस्ट्री स्टँडर्डफोरममध्ये (ब्रोकर्स आयएसएफ) सल्लामसलत केल्यानंतर सीसीनं ऑगस्टच्या अखेरीस मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.

गुरुवारी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, आढावा बैठक आणि ब्रोकर्स फोरमच्या निवेदनानंतर सेबीने अंमलबजावणीची तारीख ११ नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. सेबीनं एका वेगळ्या परिपत्रकात टी+१ रोलिंग सेटलमेंट अंतर्गत सिक्युरिटीज भरण्याच्या वेळेत बदल करण्याची घोषणा केली आहे.

टॅग्स :नितीन कामथसेबी