Lokmat Money >शेअर बाजार > Zerodha ची बादशाहत संपली, 'या' बाबतीत मागे टाकत Groww बनली सर्वात मोठी ब्रोकरेज कंपनी

Zerodha ची बादशाहत संपली, 'या' बाबतीत मागे टाकत Groww बनली सर्वात मोठी ब्रोकरेज कंपनी

फिनटेक स्टार्टअप ग्रो आता देशातील सर्वात मोठे ब्रोकरेज बनले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 09:46 AM2023-10-13T09:46:05+5:302023-10-13T09:46:48+5:30

फिनटेक स्टार्टअप ग्रो आता देशातील सर्वात मोठे ब्रोकरेज बनले आहे.

Zerodha not top company users base surpassing Groww to become the largest brokerage firm know details | Zerodha ची बादशाहत संपली, 'या' बाबतीत मागे टाकत Groww बनली सर्वात मोठी ब्रोकरेज कंपनी

Zerodha ची बादशाहत संपली, 'या' बाबतीत मागे टाकत Groww बनली सर्वात मोठी ब्रोकरेज कंपनी

Groww Vs Zerodha: सक्रिय गुंतवणूकदारांच्या आकडेवारीनुसार आघाडीचे फिनटेक स्टार्टअप ग्रो (Groww) आता देशातील सर्वात मोठे ब्रोकरेज बनले आहे. सक्रिय गुंतवणूकदारांच्या बाबतीत त्यांनी झिरोधाला मागे टाकलंय. देशांतर्गत एक्सचेंज एनएसई नुसार, बंगळुरू-आधारित ग्रो कडे आता ६६.३ लाख सक्रिय गुंतवणूकदार आहेत. तर झिरोदाकडे (Zerodha) 64.8 लाख सक्रिय गुंतवणूकदार आहेत. ही आकडेवारी सप्टेंबर २०२३ पर्यंतची आहे. सुमारे अडीच वर्षांपूर्वी, मार्च २०२१ मध्ये, झिरोदाचे ३४ लाख ग्राहक होते तर ग्रो चे ७.८ लाख ग्राहक होते. तेव्हापासून, झिरोदाचे युझर्स दुप्पट झालेत. तर ग्रो चे ग्राहक जवळपास ७५० टक्क्यांनी वाढलेत. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये, झिरोदाचे ६३.९ लाख ग्राहक होते आणि ग्रो चे ५३.७ लाख ग्राहक होते.

महसूलाच्या बाबती झिरोदा टॉपला
सक्रिय गुंतवणूकदारांच्या बाबतीत ग्रो नं झिरोधाला मागे टाकलंय. परंतु कमाईच्या बाबतीत झिरोदा पुढे आहे. झिरोदाचा महसूल ग्रो पेक्षा पाच पटींनी अधिक आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये, झिरोधाचा महसूल वार्षिक आधारावर ३९ टक्क्यांनी वाढून ६८७५ रुपये झाला. नफाही वाढून २९०७ कोटी रुपये झाला. त्याच वेळी, ग्रो चालवणाऱ्या नेक्स्टबिलियन टेक्नॉलॉजीचा महसूल या कालावधीत ३६७ कोटी रुपयांवरून १२९४ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. त्याच वेळी, आर्थिक वर्ष २०२३ मध्ये त्यांनी ७३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला.

F&O मुळे झिरोदा महसूलात पुढे
Groww आणि Zerodha मधील महसुलाच्या बाबतीत खूप फरक आहे. याचं कारण F&O (फ्युचर्स अँड ऑप्शन्स) ट्रेडिंगमध्ये त्यांचे वर्चस्व आहे आणि त्यातच ब्रोकरेज फर्म जास्तीत जास्त नफा कमावते. ग्रोबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी दीर्घकालीन गुंतवणूक उत्पादने आणि म्युच्युअल फंडांद्वारे नवीन ग्राहक जोडण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. दरम्यान, कंपनी डेली आणि F&O व्यापाऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.

डीमॅट खाती आणि अॅक्टिव्ह युझर्समध्ये इतका फरक
सप्टेंबर अखेरपर्यंत देशात सुमारे १२.९७ कोटी डिमॅट खाती होती. एनएसईच्या डेटानुसार, केवळ ३.३४ कोटी भारतीय वर्षातून किमान एकदा एक्सचेंजवर सक्रियपणे व्यापार करतात. अलीकडेच, Zerodha CEO नितीन कामत म्हणाले होते की खाते उघडण्यासाठी शुल्क आकारणे योग्य आहे. यामुळे ज्यांना खरोखरच व्यवसाय करायचा आहे ते लोक जोडले जातील. ग्रो बद्दल सांगायचं झालं तर, खातं उघडण्यासाठी ते कोणतंही शुल्क आकारत नाहीत, यामुळे ग्राहकांच्या बाबतीत त्यांनी झिरोधाला मागे टाकले आहे.

Web Title: Zerodha not top company users base surpassing Groww to become the largest brokerage firm know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.