Join us

पैसे तयार ठेवा! या आठवड्यात येतायेत ३ नवीन IPO; गुंतवणुकीसाठी कोणता योग्य? सर्व डिटेल्स जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 10:09 AM

IPO Calendar : या आठवड्यातील नवीन ३ कंपन्यांचे आयपीओ येत आहेत. तिन्हीही कंपन्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपली सेवा पुरवत आहेत. या तिन्ही कंपन्यांना मिळून ११७३.३ कोटी रुपये उभे करायचे आहेत.

IPO Calendar : कली कालावधीत शेअर मार्केटमधून पैसा कमावण्याचा पर्याय म्हणजे आयपीओ. गेल्या काही वर्षात आयपीने लाखो गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. वर्षभरातील आकडेवारी पाहिले तर 10 पैकी 7 आयपीओने चांगला परतावा दिला आहे. जर तुम्हीही आयपीओमधून पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर आता वेळ आली आहे. या आठवड्यात ३ कंपन्या त्यांचे IPO लॉन्च करणार आहेत. यामध्ये एक मेनबोर्ड आणि दोन SME IPO चा समावेश असेल. या तिन्ही कंपन्यांना मिळून आयपीओद्वारे एकूण ११७३.३ कोटी रुपये उभे करायचे आहेत. या आठवड्यात येणाऱ्या या IPO बद्दल सविस्तर जाणून घेऊया.

जिंका लॉजिस्टिक सोल्युशन्स (Zinka Logistics Solutions IPO)या आठवड्यात जिंका लॉजिस्टिक सोल्युशन्सचा फक्त एक मेनबोर्ड IPO लाँच होणार आहे. व्हेंचर कॅपिटल फर्म पीक XV पार्टनर्स इन्व्हेस्टमेंट्स आणि VEF AB ची गुंतवणूक असलेली ही कंपनी आहे. ही कंपनी ट्रक ऑपरेटर्ससाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म ब्लॅकबक अ‍ॅपची सेवा देते. हा आयपीओ १३ नोव्हेंबरला सबस्क्रिप्शनसाठी उघडला जाणार असून १८ नोव्हेंबरला बंद होईल. आयपीओ मधील प्राइस बँड २५९-२७३ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. कंपनीची आयपीओद्वारे १,११४.७२ कोटी रुपये उभारण्याची योजना आहे. या IPO मध्ये, ५५० कोटी रुपयांचे शेअर्सचे नवीन इश्यू आणि ५६४.७२ कोटी रुपयांच्या २.०७ कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल असणार आहे. रविवारी सकाळी ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे शेअर्स ८.७९ टक्के प्रीमियमवर व्यवहार करताना दिसले.

ओनिक्स बायोटेक (Onyx Biotec IPO)ओनिक्स बायोटेक अनेक फार्मा कंपन्यांना निर्जंतुकीकरण औषध उत्पादने पुरवते. आयपीओमध्ये किंमत ५८ रुपये ते ६१ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. कंपनीने IPO मध्ये वरच्या प्राइस बँडवर ४८.१ लाख इक्विटी शेअर्सच्या विक्रीद्वारे २९.३४ कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे. या IPO साठी सबस्क्रिप्शन १३ नोव्हेंबरला सुरू होईल आणि १८ नोव्हेंबरला बंद होईल. ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे शेअर्स ८.२० टक्के प्रीमियमने ट्रेडिंग करताना दिसले.

मंगल कंपोझ्युशन्स (Mangal Compusolution IPO)ही हार्डवेअर रेंटल सॉल्यूशन कंपनी आहे. हा १६.२३ कोटी रुपयांचा IPO आहे. या IPO मध्ये सबस्क्रिप्शन १२ नोव्हेंबरला उघडेल आणि १४ नोव्हेंबरला बंद होईल. IPO मध्ये इश्यू किंमत ४५ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. ही एक निश्चित किंमतीचा इश्यू आहे. ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे शेअर्स ६.६७ टक्के प्रीमियमने ट्रेडिंग करताना दिसत आहेत.

(Disclaimer- यामध्ये आयपीओची माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक