Lokmat Money >शेअर बाजार > Zomato Q2 Result : झोमॅटोकडून सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर; नफा ३८९ टक्क्यांनी वाढला; शेअर्सचं काय होणार?

Zomato Q2 Result : झोमॅटोकडून सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर; नफा ३८९ टक्क्यांनी वाढला; शेअर्सचं काय होणार?

Zomato Q2 Result : ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी Zomato ने सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यामध्ये कंपनीने सुमारे ६९% वाढ नोंदवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 04:49 PM2024-10-22T16:49:19+5:302024-10-22T16:49:19+5:30

Zomato Q2 Result : ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी Zomato ने सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यामध्ये कंपनीने सुमारे ६९% वाढ नोंदवली आहे.

zomato-q2-results-profit-surged-by-389-percent-board-approves-fund-raising-8500-crores | Zomato Q2 Result : झोमॅटोकडून सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर; नफा ३८९ टक्क्यांनी वाढला; शेअर्सचं काय होणार?

Zomato Q2 Result : झोमॅटोकडून सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर; नफा ३८९ टक्क्यांनी वाढला; शेअर्सचं काय होणार?

Zomato Q2 Results : ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोला (Zomato) बाजारात लवकरच तगडा स्पर्धक मिळणार आहे. दरम्यान, कंपनीने आज सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. यामध्ये सुमारे ६९% वाढीसह महसूल ४७९९ कोटी रुपये राहिला. तर निव्वळ नफ्यात ३८९% उडी घेतल्याने १७६ कोटी रुपये झाला. वास्तिवक, तिमाही आधारावर निकाल कमकुवत दिसत आहेत. जून तिमाहीत निव्वळ नफा २५३ कोटी होता, तर महसूल ४२०६ कोटी रुपये होता. EPS म्हणजे प्रति शेअर कमाई २० पैसे होती, जी जून तिमाहीत प्रति शेअर २९ पैसे होती. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीने प्रत्येक शेअरवर ४ पैशांची कमाई केली होती.

शेअर बाजाराला पाठवलेल्या माहितीमध्ये कंपनीने म्हटले आहे की, EBITDA म्हणजेच ऑपरेटिंग आधारावर झोमॅटोने सप्टेंबरच्या तिमाहीत २२६ कोटी रुपयांचा नफा कमावला होता, तर वर्षभरापूर्वी याच तिमाहीत तिला ४७ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. आज हा शेअर साडेतीन टक्क्यांच्या घसरणीसह २५६ रुपयांवर बंद झाला.

८५०० कोटी रुपयांचा निधी उभारणार
झोमॅटोच्या बोर्डाने ८५०० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा निर्णय घेतला आहे, जो QIB मार्फत केला जाईल. कंपनीकडे १० हजार कोटींहून अधिक रोख आहे. SWIGGY चा IPO देखील बाजारात येत आहे. अशा स्थितीत स्पर्धा वाढणार असल्याचे मानले जात आहे.

झोमॅटो शेअरमध्ये घसरण
झोमॅटो शेअरमध्ये आज पुन्हा घसरण पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यापासून झोमॅटो शेअर घसरत आहे. आज सप्टेंबर महिन्याच्या तिमाही निकालानंतर शेअर वाढण्याची अपेक्षा होती. आज शेअर ३.४४ टक्क्यांनी घसरला. आता तिमाही निकाल समोर आले असून बुधवारच्या सत्राकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे.
 

Web Title: zomato-q2-results-profit-surged-by-389-percent-board-approves-fund-raising-8500-crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.