Join us

५०% घसरू शकते Zomato ची शेअर प्राईज; ब्रोकरेजनं दिलं ₹१३० चं टार्गेट, अंडरपरफॉर्म रेटिंगही कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 3:49 PM

Zomato Share: फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचा शेअर बुधवारी कामकाजाच्या अखेरिस २५९.०२ रुपयांवर पोहोचला. मात्र ब्रोकरेज फर्मवर विश्वास ठेवल्यास झोमॅटोच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळू शकते.

Zomato Share: फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचा शेअर बुधवारी कामकाजाच्या अखेरिस २५९.०२ रुपयांवर पोहोचला. मात्र ब्रोकरेज फर्म मॅक्वायरीवर विश्वास ठेवल्यास झोमॅटोच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळू शकते. मॅक्वेरीनं झोमॅटोच्या शेअर्ससाठी १३० रुपयांची टार्गेट प्राईज ठेवली आहे. ब्रोकरेज हाऊसनं कंपनीच्या शेअर्सवर 'अंडरपरफॉर्म' रेटिंग कायम ठेवलंय. मॅक्वेरीच्या टार्गेट प्राईजनुसार, झोमॅटोचे शेअर्स मंगळवारच्या बंद पातळीपासून सुमारे ५०% खाली येऊ शकतात. सीएनबीसी-टीव्ही १८ ने दिलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे.

तिमाहीत १७६ कोटींचा नफा

ग्लोबल ब्रोकरेज हाऊस मॅक्वायरीने एका नोटमध्ये लिहिलंय की, ब्लिंकिट आणि झोमॅटो फूड डिलिव्हरीच्या वाढीसाठी फंडामेंटल बिल्डिंग ब्लॉक्स आणि युनिट इकॉनॉमिक्सचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीत झोमॅटोला १७६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. बेस क्वार्टरमध्ये झोमॅटोला ३६ कोटी रुपयांचा नफा झाला होता. झोमॅटोचा समावेश असलेल्या २७ अॅनालिस्ट पैकी २४ अॅनालिस्ट्सनं कंपनीच्या शेअर्सवर 'बाय' रेटिंग दिलंय. तर ३ जणांनी झोमॅटोच्या शेअर्सना सेल रेटिंग दिलंय.

वर्षभरात ११५ टक्क्यांची वाढ

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचा शेअर गेल्या वर्षभरात ११५ टक्क्यांनी वधारला आहे. झोमॅटोचा शेअर १३ नोव्हेंबर २०२३ रोजी १२२.१५ रुपयांवर होता. १३ नोव्हेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर २६३.२५ रुपयांवर पोहोचला आहे. तर झोमॅटोच्या शेअर्समध्ये या वर्षी आतापर्यंत ११० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. झोमॅटोच्या शेअरमध्ये गेल्या ६ महिन्यांत ३५ टक्क्यांहून अधिक वाढ झालीये. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर २९८.२० रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ११२.५० रुपये आहे. झोमॅटोचं मार्केट कॅप २,२९,९६५ कोटी रुपयांच्या पुढे गेलंय.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :झोमॅटोशेअर बाजारगुंतवणूक