Join us  

४७ रुपयांचा 'हा' शेअर पोहोचला २१४ रुपयांवर, गाठला नवा उच्चांक; गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 1:44 PM

Zomato Share Price Hike : कंपनीच्या शेअरनं मंगळवारी नवा उच्चांक गाठला. मंगळवारी शेअर ३ टक्क्यांनी वधारून २१४ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअरमध्ये या वर्षी आतापर्यंत ७३ टक्के वाढ झाली आहे.

Zomato Share Price Hike : फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या शेअर्सने नवा उच्चांक गाठला आहे. मंगळवारी झोमॅटोचा शेअर जवळपास ३ टक्क्यांनी वधारून २१४ रुपयांवर पोहोचला. झोमॅटोच्या शेअरमध्ये या वर्षी आतापर्यंत ७३ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात झोमॅटोच्या शेअरमध्ये १८४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. झोमॅटोचा शेअर ५२ आठवड्यांच्या २१४ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. तर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ७३.४५ रुपये आहे.

दीड वर्षात शेअरमध्ये मोठी वाढ

गेल्या दीड वर्षात झोमॅटोच्या शेअरमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. २७ जानेवारी २०२३ रोजी फूड डिलिव्हरी कंपनीचा शेअर ४६.९५ रुपयांवर होता. झोमॅटोचा शेअर ९ जुलै २०२४ रोजी २१४ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या १८ महिन्यांत कंपनीच्या शेअरमध्ये ३५३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. झोमॅटोचे शेअर्स गेल्या ४ महिन्यांत जवळपास ४५ टक्क्यांनी वधारले आहेत. तर झोमॅटोच्या शेअरमध्ये ६ महिन्यांत ६० टक्क्यांची वाढ झाली. या काळात कंपनीचे शेअर्स १३४.३० रुपयांवरून २१४ रुपयांवर गेले आहेत. फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे मार्केट कॅप १८७४८५ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

IPO मध्ये शेअरची किंमत किती?

आयपीओमधील शेअरची किंमत ७६ रुपये होती. झोमॅटोचा आयपीओ १४ जुलै २०२१ रोजी उघडला आणि १६ जुलै २०२१ पर्यंत खुला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये शेअरची किंमत ७६ रुपये होती. २३ जुलै २०२१ रोजी कंपनीचा शेअर ११५ रुपयांवर लिस्ट झाला होता. झोमॅटोचा आयपीओ ३८.२५ पट सब्सक्राइब झाला होता. 

कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा ७.४५ पट सब्सक्राइब करण्यात आला होता. तर नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (एनआयआय) कॅटेगरीचा हिस्सा ३२.९६ पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा (क्यूआयबी) कोटा ५१.७९ पट सब्सक्राइब करण्यात आला होता.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :झोमॅटोगुंतवणूक