Join us  

Zomato Share Price : ३२० रुपयांपर्यंत जाऊ शकतात Zomato चे शेअर्स; Blinkitच्या ऑर्डर्स ऑल टाईम हायवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 12:32 PM

Zomato Share Price : फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या शेअर्समध्ये प्रचंड तेजी दिसून येत आहे. झोमॅटोचा शेअर सोमवारी कामकाजादरम्यान ५ टक्क्यांहून अधिक वाढून २८० रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सनं उच्चांकी स्तर गाठला आहे.

Zomato Share Price : फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या शेअर्समध्ये प्रचंड तेजी दिसून येत आहे. झोमॅटोचा शेअर सोमवारी कामकाजादरम्यान ५ टक्क्यांहून अधिक वाढून २८० रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सनं उच्चांकी स्तर गाठला आहे. मात्र यानंतर त्यात थोडी घसरण झाली. झोमॅटोचं युनिट ब्लिंकिटच्या (Blinkit) ऑर्डर्स रविवारी ऑल टाईम हायवर पोहोचल्या, हे वृत्त समोर आल्यानंतर सोमवारी झोमॅटोच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली. ब्लिंकिटची ग्रॉस मर्चेंडाइज व्हॅल्यू (GMV) रविवारी उच्चांकी पातळीवर पोहोचली. रविवारी ब्लिंकिटला दर मिनिटाला ६९३ राख्यांची ऑर्डर मिळाली.

३२० रुपयांपर्यंत जाऊ शकतो भाव

परदेशी ब्रोकरेज हाऊस यूबीएसनं झोमॅटोच्या शेअर्सवर बाय रेटिंग कायम ठेवलं आहे. यूबीएसनं झोमॅटोचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊसनं झोमॅटोच्या शेअर्सचं टार्गेट प्राइस ३२० रुपयांपर्यंत वाढवलं आहे. यूबीएसने यापूर्वी झोमॅटोच्या शेअर्ससाठी २६० रुपयांची टार्गेट प्राईज ठेवली होती.  ब्रोकरेज हाऊस सीएलएसएने झोमॅटोच्या शेअर्ससाठी ३५० रुपयांचं टार्गेट ठेवलं आहे.

वर्षभरात २१० टक्क्यांची वाढ

गेल्या वर्षभरात झोमॅटोचे शेअर्स २१० टक्क्यांनी वधारले आहेत. २१ ऑगस्ट २०२३ रोजी फूड डिलिव्हरी कंपनीचा शेअर ८९.७२ रुपयांवर होता. झोमॅटोचा शेअर १९ ऑगस्ट २०२४ रोजी २८० रुपयांवर पोहोचला आहे. झोमॅटोच्या शेअरमध्ये या वर्षी आतापर्यंत १२५ टक्के वाढ झाली. या वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी २०२४ रोजी झोमॅटोचा शेअर १२४.५० रुपयांवर होता, जो आता २८० रुपयांवर पोहोचलाय. गेल्या ६ महिन्यांत झोमॅटोच्या शेअरमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. झोमॅटोचा शेअर ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर २८० रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ८८.१६ रुपये आहे.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :झोमॅटोशेअर बाजारगुंतवणूक