Join us  

Zomato च्या शेअरनं केला रेकॉर्ड, २ महिन्यांत ५३ टक्क्यांची जबरदस्त वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 5:10 PM

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या (Zomato) शेअर्सची मोठी चर्चा होती.

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या (Zomato) शेअर्सची मोठी चर्चा होती. दरम्यान, कंपनीच्या शेअर्सनं आता महत्त्वाची पातळी ओलांडली आहे. शुक्रवारी झोमॅटोचे शेअर्स वर्षभरानंतर त्यांच्या IPO किमतीला ओलांडून वर पोहोचले. शुक्रवारी झोमॅटोचे शेअर 77.30 रुपयांवर पोहोचले आहेत. झोमॅटोच्या IPO दरम्यान त्याची किंमत 76 होती. तर दुसरीकडे कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 40.55 रुपये आहे.

गेल्या 4 महिन्यांत झोमॅटोच्या शेअर्समध्ये सुमारे 63 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर 2 महिन्यांत यात तब्बल 53 टक्क्यांची वाढ झाली 6 फेब्रुवारी 2023 रोजी कंपनीचे शेअर्स मुंबई शेअर बाजारावर (BSE) 47.75 रुपयांवर व्यवहार करत होते. 9 जून 2023 रोजी झोमॅटोचे शेअर्स बीएसईवर 77.30 रुपयांवर पोहोचले. गेल्या 2 महिन्यांत झोमॅटोचे शेअर्स 49 टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीचे शेअर्स 6 एप्रिल 2023 रोजी 52.13 रुपयांवर होते, जे आता 77.30 रुपयांवर पोहोचले आहेत.

100 रुपयांचं टार्गेट प्राईजब्रोकरेज हाऊस जेफरीजनं झोमॅटोच्या शेअर्ससाठी 100 रुपयांचं टार्गेट दिलं आहे. जेफरीजने कंपनीच्या शेअर्सला बाय रेटिंग दिले आहे. Emkay Global ने झोमॅटोच्या स्टॉकवर 90 रुपयांच्या टार्गेटसह बाय रेटिंग दिलेय. त्याच वेळी, विदेशी ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टॅनलीने झोमॅटोवर वर ओव्हरवेट रेटिंगसह 85 रुपयांचे टार्गेट प्राईज दिलेय.(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

टॅग्स :झोमॅटोगुंतवणूक