Lokmat Money > बिझनेस न्यूज > Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे

Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे

Post Office Saving Schemes 2024: पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये तुम्हाला दरमहा उत्पन्न मिळतं. भारत सरकारची ही योजना पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जात आहे.

By जयदीप दाभोळकर | Published: September 20, 2024 10:42 AM2024-09-20T10:42:55+5:302024-09-20T10:44:21+5:30

Post Office Saving Schemes 2024: पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये तुम्हाला दरमहा उत्पन्न मिळतं. भारत सरकारची ही योजना पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जात आहे.

Super hit scheme of Post Office rs 9250 per month for up to 5 years See the benefits of the scheme investment tips | Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे

Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे

Post Office Monthly Income Scheme: पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये (एमआयएस), तुम्हाला दरमहा उत्पन्न मिळतं. भारत सरकारची ही योजना पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जात आहे. मासिक उत्पन्न योजना योजनेअंतर्गत, तुम्ही एकदा पैसे जमा करता आणि तुम्हाला त्यानंतर ५ वर्षांसाठी दर महिन्याला पैसे मिळतील. पोस्टाच्या योजना या जोखिममुक्त असतात. यामध्ये तुम्हाला परताव्याची हमीही मिळते. जर तुम्हाला घरी बसून नियमित उत्पन्न हवं असेल तर तुम्ही या पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करू शकता. यामध्ये गुंतवलेले पैसे तुम्हाला ५ वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर मिळतील.

किती गुंतवणूक करावी लागेल?

जर तुम्हाला एमआयएस स्कीमद्वारे दरमहा ९२५० रुपये कमवायचे असतील तर तुम्हाला संयुक्त खात्याद्वारे १५ लाख रुपये गुंतवावे लागतील. जर तुम्ही या योजनेत १५ लाख रुपये गुंतवले तर ७.४ टक्के व्याजदराने तुम्हाला पाच वर्षांसाठी ०२५० रुपये मासिक उत्पन्न मिळेल. जर तुमचं एक खातं असेल आणि एकट्या व्यक्तीनं गुंतवणूक केली असेल तर तुम्ही ९ लाख रुपये गुंतवू शकाल. यातून तुम्हाला ५५५० रुपये मासिक उत्पन्न मिळेल. ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंट परत मिळेल.

किती करावी लागेल गुंतवणूक?

एमआयएस खातं किमान १००० रुपये आणि १००० च्या पटीत उघडता येतं. एमआयएस योजनेअंतर्गत सिंगल खात्यात जास्तीत जास्त ९ लाख रुपये आणि संयुक्त खात्यात १५ लाख रुपये गुंतवता येतात. यावर सरकार दरवर्षी ७.४ टक्के दरानं व्याज देत आहे. दर महिन्याला तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीनुसार मासिक उत्पन्न मिळेल. यामध्ये जर तुम्ही पाच वर्षापूर्वी पैसे काढले तर तुमच्या मूळ रकमेतून १ टक्के रक्कम कापली जाईल.

व्याज - खातं उघडण्याच्या तारखेपासून एक महिना पूर्ण झाल्यानंतर आणि मॅच्युरिटीवर व्याज दिलं जातं. जर खातेधारक प्रत्येक महिन्याच्या व्याजाचा दावा करत नसेल, तर त्यावर कोणतंही अतिरिक्त व्याज दिलं जात नाही. यावर मिळणाऱ्या व्याजावर करही आकारला जातो.

Web Title: Super hit scheme of Post Office rs 9250 per month for up to 5 years See the benefits of the scheme investment tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.