Lokmat Money > बिझनेस न्यूज > Tata Steel News: टाटा स्टीलनं 'हा' प्रकल्प केला बंद, हजारो लोकांची नोकरी जाणार का?

Tata Steel News: टाटा स्टीलनं 'हा' प्रकल्प केला बंद, हजारो लोकांची नोकरी जाणार का?

Tata Steel Plant News : टाटा समूहाची कंपनी टाटा स्टील तुम्हाला माहित असेलच. त्यांनी आता आपला एक मोठा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतलाय.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 11:47 AM2024-10-01T11:47:58+5:302024-10-01T11:48:32+5:30

Tata Steel Plant News : टाटा समूहाची कंपनी टाटा स्टील तुम्हाला माहित असेलच. त्यांनी आता आपला एक मोठा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतलाय.

Tata Steel has closed united kingdom project will thousands of jobs be lost know details | Tata Steel News: टाटा स्टीलनं 'हा' प्रकल्प केला बंद, हजारो लोकांची नोकरी जाणार का?

Tata Steel News: टाटा स्टीलनं 'हा' प्रकल्प केला बंद, हजारो लोकांची नोकरी जाणार का?

Tata Steel Plant News : टाटा समूहाची कंपनी टाटा स्टील (Tata Steel) तुम्हाला माहित असेलच. युके मधील पोर्ट टॅलबोट (Port Talbot) येथे त्यांचा एक स्टील प्लांट आहे. त्या संपूर्ण परिसरातील हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील स्टील प्रोडक्शनचं काम थांबवण्यात आलंय. या निर्णयाची अंमलबजावणी बुधवारपासून करण्यात आली. कंपनीनं ब्लास्ट फर्नेस, सिंटर प्लांट आणि सेकंडरी स्टील प्लांट आणि तेथे असलेली काही एनर्जी सिस्टम्सही बंद केली आहेत.

यापूर्वी कोक ओव्हन बंद

टाटा स्टीलनं या वर्षाच्या सुरुवातीला पोर्ट टॅलबोट प्रकल्पातील ब्लास्ट फर्नेस आणि कोक ओव्हन बंद केलं होतं. खरं तर हा प्लांट अतिशय जुना आहे आणि ही असेट्स अखेरच्या टप्प्यावर पोहोचली आहेत. हा प्रकल्प सध्याच्या स्वरूपात चालवणे आर्थिक व पर्यावरणदृष्ट्या व्यवहार्य नाही.

नव्या प्रकल्पाचं काम सुरू

"टॅलबोट आता अतिशय परिचित प्रकल्प आहे याची आम्हाला कल्पना आहे. या ठिकाणी उत्पादन वाढीसाठी कायमच नव्या तंत्रज्ञांनाचा अवलंब करण्यासाठी चालना देण्यात आली. अन्य स्टील उत्पादकांसाठी हा प्रकल्प कायमच मानकं निश्चिक करतो," अशी प्रतिक्रिया टाटा स्टील युकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नायर यांनी दिली. "आम्ही कमीतकमी CO2 स्क्रॅप आधारित स्टीलमेकिंगमध्ये १.२५ बिलियन पौंड्स गुंतवणूकीच्या माध्यमातून उज्ज्वल आणि हरित भविष्याची योजना आखत आहोत. यामुळे ब्रिटनमध्ये ५ हजारांपेक्षा अधिक नोकऱ्या कायम राहतील. ब्रिटनमधील टाटा स्टीलच्या व्यवसायाला स्पर्धेत ठेवण्यासही मदत करेल," असंही त्यांनी नमूद केलं.

३-४ वर्षांत उत्पादन होणार सुरू

टाटा स्टीलचा पोर्ट टॅलबोट येथील नवीन प्रकल्प २०२७ किंवा २०२८ पर्यंत सुरू होईल. तेथे टाटा स्टील स्क्रॅप स्टीलचा वापर करून स्टील तयार करणार आहे. लवकरच प्रकल्पासाठी उपकरणांची ऑर्डर दिली जाईल.

Web Title: Tata Steel has closed united kingdom project will thousands of jobs be lost know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.