Lokmat Money > बिझनेस न्यूज > टाटा सन्सच्या मंडळामध्ये नोएल यांचा होऊ शकतो समावेश

टाटा सन्सच्या मंडळामध्ये नोएल यांचा होऊ शकतो समावेश

टाटा सन्स फाऊंडेशनमध्ये नोएल टाटांचा समावेश केला गेला आणि हे दोघेही भाऊ पूर्वीपेक्षा आणखी जवळ आल्यास आश्चर्य वाटायला नको.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 09:26 AM2020-07-18T09:26:47+5:302020-07-18T09:27:09+5:30

टाटा सन्स फाऊंडेशनमध्ये नोएल टाटांचा समावेश केला गेला आणि हे दोघेही भाऊ पूर्वीपेक्षा आणखी जवळ आल्यास आश्चर्य वाटायला नको.

tata trusts plan to appoint ratan tata half brother noel tata on tata sons board | टाटा सन्सच्या मंडळामध्ये नोएल यांचा होऊ शकतो समावेश

टाटा सन्सच्या मंडळामध्ये नोएल यांचा होऊ शकतो समावेश

मुंबईः टाटांचा सावत्र भाऊ नोएल टाटा यांना टाटा सन्स बोर्डावर आणण्याचा टाटा ट्रस्ट विचार करीत आहेत. टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्ट फाऊंडेशन कंट्रोलिंग शेअर होल्डर आहे. विश्वस्त मंडळ नामनिर्देशित(नॉमिनी) वाढविण्याचा विचार करीत आहे. सद्यस्थितीत टाटा सन्सच्या मंडळावर सध्या फक्त एकच उमेदवार वेणू श्रीनिवासन आहेत, जे फाऊंडेशनचे उपाध्यक्ष आहेत. रतन टाटा आणि नोएल टाटा यांच्या निकटच्या विश्वासू व्यक्तीनं सांगितलं की, टाटा सन्स फाऊंडेशनमध्ये नोएल टाटांचा समावेश केला गेला आणि हे दोघेही भाऊ पूर्वीपेक्षा आणखी जवळ आल्यास आश्चर्य वाटायला नको.

माजी अध्यक्ष सायरस मिस्त्रीविरुद्धच्या लढाईत रतन टाटा यांना नोएल टाटांनी मदत केली होती. असेही म्हटले जाते की, रतन टाटा नोएल टाटाच्या तीन मुलांच्या अगदी जवळ आहेत. टाटा ट्रस्ट आता टाटा सन्सच्या मंडळावर नोएल टाटा यांना घेण्याचा विचार करीत आहेत. मात्र, रतन टाटा यांच्या कार्यालयाकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. नियमानुसार टाटा ट्रस्ट बोर्डावर जवळपास एक तृतीयांश संचालकांची नेमणूक करू शकतात.

टाटा सन्सच्या मंडळावर सध्या ८ संचालक आहेत, त्यापैकी निम्मे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्यासह कार्यकारी/बिगर कार्यकारी संचालक आहेत. तीन बाह्य/स्वतंत्र संचालक आणि श्रीनिवासन आहेत. श्रीनिवासन टीव्हीएस मोटर कंपनीचे अध्यक्ष आहेत आणि टाटा सन्समध्ये स्वतंत्र संचालक आहेत, जर नोएल टाटा कंपनीच्या मुख्य गुंतवणूकदाराच्या मंडळावर असतील, तर ते टाटा सन्स आणि पॅरंट ट्रस्टच्या पॅनेलमधील संस्थापक घराण्याचे एकमेव सदस्य असतील. नोएल यांची आई सिमोन या 2006पर्यंत टाटा इंडस्ट्रीज या दुसर्‍या क्रमांकाच्या गुंतवणूकदार कंपनीत संचालक होत्या.

Web Title: tata trusts plan to appoint ratan tata half brother noel tata on tata sons board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tataटाटा