Lokmat Money > बिझनेस न्यूज > Airtel, Jio, Vi नं केलेली दरवाढ, आता BSNL टॅरिफ प्लॅन्स वाढवणार का, पाहा काय म्हटलं कंपनीनं?

Airtel, Jio, Vi नं केलेली दरवाढ, आता BSNL टॅरिफ प्लॅन्स वाढवणार का, पाहा काय म्हटलं कंपनीनं?

BSNL News : काही दिवसांपूर्वीच खासगी टेलिकॉम कंपन्या एअरटेल, रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया यांनी आपल्या टॅरिफ प्लॅनमध्ये बदल केले होते. आता कंपनीच्या अध्यक्षांनी टॅरिफवर भाष्य केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 11:28 AM2024-10-23T11:28:38+5:302024-10-23T11:29:28+5:30

BSNL News : काही दिवसांपूर्वीच खासगी टेलिकॉम कंपन्या एअरटेल, रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया यांनी आपल्या टॅरिफ प्लॅनमध्ये बदल केले होते. आता कंपनीच्या अध्यक्षांनी टॅरिफवर भाष्य केलं आहे.

telecom tariff increased by Airtel Jio Vi now BSNL no plan to increase mobile recharge plans see details | Airtel, Jio, Vi नं केलेली दरवाढ, आता BSNL टॅरिफ प्लॅन्स वाढवणार का, पाहा काय म्हटलं कंपनीनं?

Airtel, Jio, Vi नं केलेली दरवाढ, आता BSNL टॅरिफ प्लॅन्स वाढवणार का, पाहा काय म्हटलं कंपनीनं?

BSNL News : काही दिवसांपूर्वीच खासगी टेलिकॉम कंपन्या एअरटेल, रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया यांनी आपल्या टॅरिफ प्लॅनमध्ये बदल केले होते. परंतु बीएसएनएलनं कोणतेही बदल केलेले नव्हते. जर तुम्ही बीएसएनएल कंपनीचं सिम वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बीएसएनएल ग्राहकांना महागाईचा फटका बसणार नाही. कंपनीनं सध्या टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. एकीकडे खासगी कंपन्या आपले टॅरिफ प्लॅन महाग करत असताना बीएसएनएलचा हा निर्णय युजर्ससाठी दिलासादायक बातमी आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडचे (BSNL) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रॉबर्ट रवी यांनी नजीकच्या काळात दरवाढ करण्याचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केलंय. "आज आमचं मुख्य ध्येय आपल्या युझर्सना खुश ठेवण्यावर आणि त्यांचा विश्वास जिंकण्यावर आहे. त्यामुळे नजीकच्या काळात दरवाढीची गरज वाटत नाही," असं त्यांनी नमूद केलं. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियासह भारतातील खासगी कंपन्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला दरवाढ केल्यानंतर बीएसएनएलचं हे पाऊल महत्त्वाचं मानलं जात आहे.

कंपनीनं लोगो बदलला

देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलचा चेहरामोहरा बदलला आहे. कंपनी लवकरच आपल्या ४जी आणि ५जी सेवांची सरुवात करणार असून त्यापूर्वी कंपनीनं एक महत्त्वाचा आणि मोठा बदल केलाय. कंपनीनं मंगळवारी आपला नवा लोगो लाँच केला. यासोबतच त्यांनी ७ नव्या सेवांचीही घोषणा केली. 

कोणत्या नव्या सेवा मिळणार?

BSNL स्मॅम फ्री नेटवर्क - स्पॅम-ब्लॉकिंग तंत्रज्ञानामुळे फिशिंग आणि फसवणुकीचे मेसेज ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापासून रोखले जातील. तसंच अशा मेसेजेसबाबत ग्राहकांना सतर्क केलं जाणार आहे.

BSNL नॅशनल वायफाय रोमिंग - बीएसएनएलची पहिली एफटीटीएच बेस्ड सिमलेस वाय-फाय रोमिंग सेवा बीएसएनएल ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय बीएसएनएलहॉटस्पॉटवर हायस्पीड इंटरनेट वापरण्यास सक्षम करेल. ज्यामुळे त्यांचे इंटरनेट बिल कमी होईल.

BSNL आयएफटीव्ही - बीएसएनएल भारतात पहिल्यांदा फायबर आधारित इन्ट्रानेट टीव्ही सेवा सुरू करणार आहे. एफटीएच नेटवर्कच्या माध्यमातून ५०० पेक्षा अधिक चॅनल पाहता येणारेत.

एनी टाईम किऑस्क - स्वयंचलित सिम किऑस्क ग्राहकाला २४/७ सिम खरेदी, अपग्रेड, पोर्ट किंवा सिम बदलण्याची सुविधा देते. सर्चलेस केवायसी आणि मल्टी लँग्वेज यूपीआय/क्यूआर-सक्षम पेमेंट सिस्टीमचादेखील लाभ घेता येणार आहे.

डायरेक्ट टू डिव्हाईस सेवा - भारताची पहिली डायरेक्ट टू डायरेक्ट (D2D) कनेक्टिव्हीटी. उपग्रह आणि ग्राऊंड मोबाइल नेटवर्कला इंटिग्रेट करुन कनेक्टिव्ही देते.

'सार्वजनिक सुरक्षा आणि आपत्ती निवारण' - बीएसएनएलचं स्केलेबल, सुरक्षित नेटवर्क संकटकाळात सरकार आणि मदत एजन्सींसाठी भारतातील पहिल्या गॅरंटीड एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन डिझास्टर रिस्पॉन्ससाठी उपयुक्त ठरेल. आणीबाणीच्या काळात कव्हरेज वाढवण्यासाठी ड्रोन-आधारित आणि बलून-आधारित सिस्टम आहे.

खाणींमध्ये पहिली खासगी ५जी सेवा - बीएसएनएलनं सी-डॅकच्या सहकार्यानं खाण कामासाठी विश्वासार्ह, जलद ५जी कनेक्टिव्हिटी सुरू केली आणि प्रगत एआय आणि आयओटीच्या मदतीने भूमिगत खाणी आणि मोठ्या ओपनकास्ट खाणींमध्ये हाय-स्पीड लो लेटेन्सी कनेक्टिव्हिटी देईल.

Web Title: telecom tariff increased by Airtel Jio Vi now BSNL no plan to increase mobile recharge plans see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.