Coffee Day Enterprises Ltd Share: कॅफे कॉफी डे चेन चालवणाऱ्या कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेडचे (CDEL) शेअर्स मंगळवार, ५ नोव्हेंबरपासून सस्पेंड करण्यात आले आहेत. दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू असलेल्या कंपनीनं मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, शेअर बाजारांनी अतिरिक्त देखरेख उपायांअंतर्गत (ASM) आपल्या सिक्युरिटीजचे व्यवहार स्थगित केले आहेत. हे ५ नोव्हेंबर २०२४ पासून लागू करण्यात आलेय. सोमवारी कंपनीचा शेअर ३४.१७ रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या शेअर्समध्ये आज कोणताही व्यवहार झालेला नाही.
कंपनीनं काय म्हटलं?
"आम्ही तुम्हाला सूचित करू इच्छितो की अतिरिक्त देखरेख (एएसएम) उपाय म्हणून, स्टॉक एक्स्चेंजनं कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेडच्या सिक्युरिटीजचा व्यवसाय स्थगित केला आहे. त्यानं दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहितेनुसार कंपन्यांसाठी एएसएम अंतर्गत निकषांची पूर्तता केली आहे. आयबीसी फेज १ मध्ये कमीतकमी १ महिना उलटल्यानंतर स्टॉक एक्स्चेंजद्वारे पुढील पुनरावलोकन होईपर्यंत आठवड्यातून एकदाच (दर सोमवारी किंवा आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग डे) सिक्युरिटीचा व्यवहार केला जाईल. ८ ऑगस्ट २०२४ रोजी, बंगळुरू येथील राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एनसीएलटी) सीडीईएलसाठी कॉर्पोरेट दिवाळखोरी निवारण प्रक्रिया (सीआयआरपी) सुरू करत आहे," असं एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटलंय.
काय आहेत डिटेल्स?
कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत होती. कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेडचा शेअर सहा महिन्यांत ४३ टक्क्यांनी घसरला. या वर्षी आतापर्यंत हा शेअर ४७ टक्के आणि वर्षभरात ३० टक्क्यांनी घसरला आहे. १२ जानेवारी २०१८ रोजी शेअरचा भाव ३४८ रुपये होता, तेव्हापासून त्यात ९० टक्क्यांची घसरण झाली आहे. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी भाव ७४.५४ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी भाव २८.१४ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप ७२२.०६ कोटी रुपये आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)