Lokmat Money > बिझनेस न्यूज > Vedanta Job News : वेदांता 'या' क्षेत्रात करणार १ लाख कोटींची गुंतवणूक; २ लाख लोकांना मिळणार रोजगार, पाहा डिटेल्स

Vedanta Job News : वेदांता 'या' क्षेत्रात करणार १ लाख कोटींची गुंतवणूक; २ लाख लोकांना मिळणार रोजगार, पाहा डिटेल्स

वेदांता समूहानं देशात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय. पाहा कुठे आणि कोणत्या क्षेत्रात वेदांता करणार गुंतवणूक,

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 11:30 AM2024-10-21T11:30:48+5:302024-10-21T11:30:48+5:30

वेदांता समूहानं देशात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय. पाहा कुठे आणि कोणत्या क्षेत्रात वेदांता करणार गुंतवणूक,

Vedanta will invest 1 lakh crores in zink oil and gas sector 2 lakh people will get employment see details | Vedanta Job News : वेदांता 'या' क्षेत्रात करणार १ लाख कोटींची गुंतवणूक; २ लाख लोकांना मिळणार रोजगार, पाहा डिटेल्स

Vedanta Job News : वेदांता 'या' क्षेत्रात करणार १ लाख कोटींची गुंतवणूक; २ लाख लोकांना मिळणार रोजगार, पाहा डिटेल्स

Vedanta Investment : वेदांता समूहानं देशात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय. वेदांता समूहाने राजस्थानमधील ऑईल आणि गॅस, झिंक आणि रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या गुंतवणुकीमुळे राज्यात दोन लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे, मात्र कंपनीनं ही गुंतवणूक कधीपर्यंत करणार आहे याची माहिती दिलेली नाही.

या एकूण गुंतवणुकीपैकी ३० हजार कोटी रुपये झिंक उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी वापरले जातील, ज्यामुळे वार्षिक २ मिलियन टन झिंक आणि २००० टन चांदीचं उत्पादन होईल. हिंदुस्थान झिंक ही कंपनीची फ्लॅगशिप युनिट असून भारतातील झिंक आणि चांदीची सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. याशिवाय १ मिलियन टन क्षमतेचा खत प्रकल्पही उभारण्यात येणार आहे.

कॅरन ऑईल अँड गॅस ३५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, तर सेरेंटिका रिन्यूएबल्स १०,००० मेगावॅट रिन्यूएबल एनर्जी क्षमता विकसित करण्यासाठी ५०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. "हायड्रोकार्बन आणि जसं की झिंक, शिसं, चादी, सोनं, तांबे, पोटॅशिअम आणि अन्य महत्त्वाची खनिजं असलेल्या राज्यांपैकी राजस्थान एक आहे," असं वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल म्हणाले.

ओडिशातही करणार गुंतवणूक

याशिवाय शुक्रवारी कंपनीनं ओडिशातही १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. या ठिकाणी ६ मिलियन टन अॅल्युमिना रिफायनरी आणि ३ मिलियन टन अॅल्युमिनिअम संयंत्र स्थापन केलं जाणार आहे. वेदांता ही भारतातील सर्वात मोठी अॅल्युमिनिअम उत्पादक आहे. ओडिशातील लंजिगढ येथे त्यांची ३.५ मिलियन टन अॅल्युमिना रिफायनरी आहे. तसंच त्याच्या जवळ झारसुगुडामध्ये १.८ मिलियन टन क्षमतेचं स्मेल्टरही आहे.

Web Title: Vedanta will invest 1 lakh crores in zink oil and gas sector 2 lakh people will get employment see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.