Virat Kohali Investment : विराट कोहलीने पर्थ कसोटी सामन्यात आपलं ८१ वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं. तेव्हापासून त्याच्यासाठी सातत्यानं आनंदाची बातमी येत आहे. आता जी बातमी आली आहे ती आणखी चांगली आहे. त्याच्या आवडत्या कंपनी गो डिजिटच्या शेअरमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. ज्यामुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये ८३८ कोटीरुपयांपेक्षा जास्त वाढ झाली. विशेष म्हणजे विराट कोहलीच्या कमाईतही वाढ झाली आहे. या कंपनीत त्याची मोठी गुंतवणूक आहे.
अशा तऱ्हेनं जगातील सर्वोत्तम फलंदाज असलेल्या कोहलीला गो डिजिट शेअर्समध्ये वाढ झाल्यानं २४ लाखांहून अधिक रुपयांचा फायदा झाला आहे. गेल्या काही वर्षात विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी कंपनीकडून ७ कोटींहून अधिक कमाई केली आहे.
कंपनीच्या शेअरमध्ये वाढ
शुक्रवारी विराट कोहलीची आवडती कंपनी गो डिजिटच्या शेअरमध्ये चांगली वाढ दिसून आली. बीएसईच्या आकडेवारीनुसार गो डिजिटचा शेअर २.७३ टक्क्यांनी वधारून ३४२.६० रुपयांवर बंद झाला. ट्रेडिंग सेशनदरम्यान कंपनीचा शेअर ३४४.३० रुपयांवर पोहोचला. कंपनीचा शेअर किरकोळ घसरणीसह ३३०.१५ रुपयांवर उघडला होता. ४ सप्टेंबर रोजी या शेअरनं ५०७.५५ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर मजल मारली होती. ४ जून रोजी कंपनीचा शेअर २७७.८० रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता.
मार्केट कॅपमध्ये प्रचंड वाढ
या वाढीसह विराट कोहलीची आवडती कंपनी गो डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनीच्या मार्केट कॅपमध्येही वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये ८०० कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली. गुरुवारी शेअर बाजार बंद झाला तेव्हा कंपनीचं मार्केट कॅप ३०,७२८.६५ कोटी रुपये होतं, जे शुक्रवारी वाढून ३१,५६७.१३ कोटी रुपये झालं. म्हणजेच गो डिजिटच्या मार्केट कॅपमध्ये ८३८.४८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
विराटला मोठा फायदा
विराट कोहलीलाही याचा खूप फायदा झाला आहे. विराट कोहलीकडे कंपनीचे २ लाख शेअर्स आहेत. तर अनुष्काकडे कंपनीचे ६६,६६७ शेअर्स आहेत. म्हणजेच दोघांकडे कंपनीचे २,६६,६६७ शेअर्स आहेत. ज्याचं मूल्य गुरुवारी ८,८९,३३,४४४.५ रुपये होते. जे शुक्रवारी ९,१३,६०,११४.२ रुपये झालं. म्हणजेच विराट आणि अनुष्काला २४,२६,६६९.७ रुपयांचा फायदा झाला. विराट आणि अनुष्काने ७५ रुपये प्रति शेअर या दरानं कंपनीत २,००,००,०२५ रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यानंतर दोघांच्या गुंतवणुकीच्या मूल्यात ७,१३,६०,०८९.२ रुपयांची वाढ झाली आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)