सप्टेंबर तिमाहीत निफ्टी ५०० कंपन्यांच्या नफ्यात १ टक्क्यांनी घट झाली आहे. अनेक क्षेत्रांमध्ये घसरण दिसून आली. यादरम्यान, व्होडाफोन आयडियाला सर्वाधिक तोटा सहन करावा लागला. कमकुवत मागणी आणि सरकारी खर्चात कपात यामुळे ब्रोकरेजनं निफ्टीचं टार्गेट कमी केलं आहे. तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करणाऱ्या शेअर्सवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे.
जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत निफ्टी ५०० कंपन्यांच्या उत्पन्नात १ टक्क्यांनी घट झाली. या घसरणीचे मुख्य कारण म्हणजे अनेक क्षेत्रांतील कमकुवत कामगिरी. सिमेंट, टेलिकॉम, रिटेल आणि ऑईल अँड गॅस अशा आठ क्षेत्रांतील उत्पन्न घटलं आहे. याशिवाय विक कन्झम्शन, मंदावलेला सरकारी खर्च आणि बीएफएसआय क्षेत्रातील मालमत्तेच्या गुणवत्तेच्या मुद्द्यांचाही कंपन्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. या कमकुवत कामगिरीमुळे ब्रोकरेज हाऊस निफ्टी फिनीचं टार्गेट कमी करत आहे.
मात्र, आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या उत्तरार्धात सरकारी खर्चात वाढ होऊन खरिपाचे चांगले पीक आल्यास ग्रामीण भागातील मागणी सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे कंपन्यांच्या उत्पन्नात सुधारणा होऊ शकते.
सर्वाधिक नुकसा झालेल्या १० कंपन्या
सप्टेंबर तिमाहीत व्होडाफोन आयडियाला सर्वाधिक तोटा झाला. कंपनीचा तोटा ७,१७६ कोटी रुपये होता. सन्मान कॅपिटल (पूर्वीचे इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स) २,७६१ कोटी रुपयांच्या तोट्यासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंडियन ऑईलचा तोटाही ११०० कोटींहून अधिक होता. इंडिगो चालवणाऱ्या इंटरग्लोब एव्हिएशन, एमटीएनएल, युनिटेक, मंगलोर रिफायनरी, चेन्नई पेट्रोलियम, एनएमडीसी स्टील आणि ओला इलेक्ट्रिक या कंपन्यांनीही खराब कामगिरी केली.
मोतीलाल ओसवालनं १२१ कंपन्यांच्या उत्पन्नाच्या अंदाजात ३ टक्क्यांहून अधिक कपात केली आहे. यामध्ये बीपीसीएल, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्स आणि ट्रेंट या कंपन्यांचा समावेश आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)