Lokmat Money > बिझनेस न्यूज > फक्त 7 रुपयांमध्ये दिवसाला 3GB डेटा, फ्री कॉलिंगचाही फायदा; असे आहेत 'या' तीन कंपन्यांचे 'बिग प्लॅन'

फक्त 7 रुपयांमध्ये दिवसाला 3GB डेटा, फ्री कॉलिंगचाही फायदा; असे आहेत 'या' तीन कंपन्यांचे 'बिग प्लॅन'

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया यांच्याकडे दिवसाला 3GB डेटा देणारे प्लॅन्स आहेत. तर जानून घेऊयात, कोन देतंय सर्वात स्वत दिवसाला 3 जीबी डेटा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 02:51 PM2020-04-25T14:51:30+5:302020-04-25T15:16:36+5:30

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया यांच्याकडे दिवसाला 3GB डेटा देणारे प्लॅन्स आहेत. तर जानून घेऊयात, कोन देतंय सर्वात स्वत दिवसाला 3 जीबी डेटा...

 Vodafone Reliance jio and Airtel cheapest daily 3gb data plan | फक्त 7 रुपयांमध्ये दिवसाला 3GB डेटा, फ्री कॉलिंगचाही फायदा; असे आहेत 'या' तीन कंपन्यांचे 'बिग प्लॅन'

फक्त 7 रुपयांमध्ये दिवसाला 3GB डेटा, फ्री कॉलिंगचाही फायदा; असे आहेत 'या' तीन कंपन्यांचे 'बिग प्लॅन'

Highlightsदेशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे मोबाईलवर डेटा वापरण्याचे प्रमाण वाढले आहेरिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया यांच्याकडे दिवसाला 3GB डेटा देणारे प्लॅन्स आहेतडेटा बरोबरच आणखीही बरच काही देतायेत या कंपन्या

नवी दिल्ली - देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे मोबाईलवर डेटा वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आता, कमितकमी पैशांत अधिक डेटा देणारे प्लॅन्स लोकांना हवे आहेत. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया यांच्याकडे दिवसाला 3GB डेटा देणारे प्लॅन्स आहेत. या तिन्ही कंपन्यांच्या प्लॅनमध्ये व्होडाफोन-आयडियाचा एक प्लॅन असाही आहे, जो 7.12 रुपयांमध्ये रोज 3GB डेटासोबतच फ्री कॉलिंगचीही सुविधा देतो. हा व्होडाफोनचा डबल डेटा ऑफर प्लॅन आहे. याशिवा, या प्लॅनचे काही इतर फायदेही मिळतात. एअरटेल आणि रिलायन्स जिओजवळही असे प्लॅन आहेत.

7.12 रुपयांत रोज 3GB डेटा आणि फ्री कॉलिंग -
व्होडाफोन-आयडियाचा एक विशेष प्लॅन रिचार्ज केल्यास आपल्याला 7.12 रुपयांत रोज 3GB डेटासोबतच फ्री कॉलिंग आणि इतर सुविधाही मिळतात. हा व्होडाफोनचा 399 रुपयांचा प्लॅन आहे. डबल डेटा ऑफरअंतर्गत या प्लॅनमध्ये सध्या रोज 3GB डेटा दिला जातो. हा प्लॅन 56 दिवसांचा आहे. याचाच अर्थ हा प्लॅन रिचार्ज केल्यानंतर आपल्याला दिवसाला 7.12 रुपयांचा खर्च येईल. या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगचीही सुविधा मिळेल. याअंतर्गत आपण देशात कुठेही मोफेत कॉल करू शकता. तसेच रोजचे 100 एसएमएस पाठवण्याची सुविधाही या प्लॅनमध्ये आहे. याशिवाय 499 रुपयांचे व्होडाफोन प्लेचे सब्सक्रिप्शन आणि 999 रुपयांचे ZEE5चे सब्सक्रिप्शनदेखील मोफत मिळेल.

Coronavirus : अर्थव्यवस्थेची चाके पुन्हा सुरू करता येतील; बिल गेट्स यांनी दिले 'हे' मोलाचे सल्ले

असा आहे एअरटेल प्लॅन -
एअरटेलकडेही एक विशेष प्लॅन आहे. एअरटेलचा हा प्लॅन 558 रुपयांचा आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 56 दिवसांची आहे. याचाच अर्थ, या प्लॅनसाठी आपल्याला रोज 9.96 रुपये मोजावे लागतील. यात आपल्याला 3GB डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 168GB डेटा मिळेल. तसेच कुठल्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंग आणि रोजचे 100 एसएमएस, ही सुविधाही मिळेल. याशिवाय, एअरटेल एक्सस्ट्रीम प्रीमियमचे फ्री सब्सक्रिप्शन, फ्री हॅलोट्यून आणि आपल्या  फोनसाठी अँटी-व्हायरसदेखील मिळेल.

असा आहे जिओचा प्लॅन -
रिलायन्स जिओकडेही रोज 3GB डेटा देणारा प्लॅन आहे. जिओचा हा प्लॅन 349 रुपयांचा आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. याचाच अर्थ या प्लॅनसाठी दिवसाला 12.46 रुपये एवढा खर्च येईल. या प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 84GB डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये यूजर्सना फ्री कॉलिंगचाही फायदा होईल. जिओच्या प्लॅनमध्ये जिओ-टू-जिओ फ्री कॉलिंग आहे. दुसऱ्या नेटवर्कच्या नंबरवर कॉल करण्यासाठी 1,000 नॉन जिओ मिनिट मिळतात. जिओच्या या प्लॅनमध्ये रोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधाही असेल. याशिवाय जिओ अॅप्सचे कॉम्प्लीमेंट्री सब्सक्रिप्शनही मिळेल. जिओकडे रोज 3GB डेटा देणारा हा एकमेव प्लॅन आहे.

CoronaVirus: राज्यातील स्टील उद्योगाला सवलतींची गरज

Web Title:  Vodafone Reliance jio and Airtel cheapest daily 3gb data plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.