Lokmat Money > बिझनेस न्यूज > Waaree Energies IPO: ३४ वर्ष जुन्या कंपनीचा IPO येणार; ऊर्जा क्षेत्रात वर्चस्व; कधीपासून गुंतवणूक करता येणार, जाणून घ्या

Waaree Energies IPO: ३४ वर्ष जुन्या कंपनीचा IPO येणार; ऊर्जा क्षेत्रात वर्चस्व; कधीपासून गुंतवणूक करता येणार, जाणून घ्या

Waaree Energies IPO: एनर्जी क्षेत्रातील आणखी एका कंपनीचा आयपीओ लवकरच गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे. कंपनीचा आयपीओ सोमवार, २१ ऑक्टोबर २०२४ रोजी खुला होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 04:18 PM2024-10-15T16:18:01+5:302024-10-15T16:18:01+5:30

Waaree Energies IPO: एनर्जी क्षेत्रातील आणखी एका कंपनीचा आयपीओ लवकरच गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे. कंपनीचा आयपीओ सोमवार, २१ ऑक्टोबर २०२४ रोजी खुला होईल.

Waaree Energies IPO 34 year old company will launch IPO dominance in the energy sector Know when you can invest | Waaree Energies IPO: ३४ वर्ष जुन्या कंपनीचा IPO येणार; ऊर्जा क्षेत्रात वर्चस्व; कधीपासून गुंतवणूक करता येणार, जाणून घ्या

Waaree Energies IPO: ३४ वर्ष जुन्या कंपनीचा IPO येणार; ऊर्जा क्षेत्रात वर्चस्व; कधीपासून गुंतवणूक करता येणार, जाणून घ्या

Waaree Energies IPO: एनर्जी क्षेत्रातील आणखी एका कंपनीचा आयपीओ लवकरच गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे. वारी एनर्जी असं या कंपनीचं नाव आहे. या ग्रीन एनर्जी कंपनीचा आयपीओ सोमवार, २१ ऑक्टोबर २०२४ रोजी खुला होईल. तर, गुंतवणूकदारांना २३ ऑक्टोबरपर्यंत यात गुंतवणूक करता येणार आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी शुक्रवार १८ ऑक्टोबर २०२४ रोजी बोली लावण्याची शक्यता आहे.

आयपीओची अधिक माहिती 

या आयपीओमध्ये ३,६०० कोटी रुपयांचे शेअर्स नव्यानं जारी करणं आणि प्रवर्तकांव्यतिरिक्त विद्यमान भागधारकांकडून ४.८ मिलियन शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) यांचा समावेश आहे. ओएफएसमध्ये प्रवर्तक वारी सस्टेनेबल फायनान्स ४.३५ मिलियन तर चांदूरकर इन्व्हेस्टमेंट ४,५०,००० शेअर्सची विक्री करत आहे. दरम्यान, कंपनीनं अद्याप आयपीओसाठी प्राईज बँड आणि लॉट साइज जाहीर केलेली नाही.

कुठे खर्च करणार पैसे?

कंपनीच्या ऑफर फॉर सेलमधून कोणतंही उत्पन्न मिळणार नाही. त्याचबरोबर नव्या इश्यूमधून मिळणारी रक्कम कंपनीच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीत गुंतवलं जाणार आहे. ओडिशामध्ये ६ गिगावॅट इंगोट वेफर्स, सोलर सेल आणि सोलर पीव्ही मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी उभारण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची योजना आहे. याशिवाय या निधीचा वापर सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठीही केला जाणार आहे. वारी एनर्जीचे शेअर्स सोमवार, २८ ऑक्टोबर २०२४ रोजी बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होणार आहेत. या कंपनीची स्थापना १९९० मध्ये करण्यात आली होती.

लिंक इनटाइम इंडिया वारी एनर्जी आयपीओची रजिस्ट्रार आहे. अॅक्सिस कॅपिटल, आयआयएफएल सिक्युरिटीज, जेफरीज इंडिया, नोमुरा फायनान्शिअल अॅडव्हायझरी अँड सिक्युरिटीज (इंडिया), एसबीआय कॅपिटल मार्केट्स, इंटेन्सिव्ह फिस्कल सर्व्हिसेस आणि आयटीआय कॅपिटल पब्लिक याचे बुक-लीड रनिंग मॅनेजर्स आहेत. 

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Waaree Energies IPO 34 year old company will launch IPO dominance in the energy sector Know when you can invest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.