- अजय मेनन
गुंतवणुकीसाठी बऱ्याचदा चांगले पर्याय उपलब्ध असतात. कुठेही केलेल्या गुंतवणुकीवरचा फायदा हा नेहमीच एखाद्यानं घेतलेल्या जोखीम क्षमतेच्या आधारावर अवलंबून असतो. यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी अर्थशास्त्र किंवा वित्त पदवीधर असणे गरजेचे नाही. त्यासाठी गुंतवणुकीतले खाचखळगे आणि फायद्याच्या गोष्टी माहीत असल्यावरही एकदी व्यक्ती चांगली गुंतवणूकदार बनू शकते. पैशांची गुंतवणूक कोठे आणि केव्हा जाते हे समजून घेतात, तेच स्मार्ट गुंतवणूक करू शकतात. यशस्वी गुंतवणुकीची धोरणे नेहमीच वैयक्तिक असणे आवश्यक असते, परंतु हेदेखील समजले पाहिजे की, ही केवळ एक सुरुवात आहे. यशस्वी गुंतवणूकदार काय करतात याचा आढावा घेतल्यास एखाद्याला आपल्या यशासाठी महत्त्वाच्या गोष्टी सहजच समजतात.
चला आता अत्यंत यशस्वी गुंतवणूकदारांच्या ५ सवयींवर नजर टाकूया.
नेहमी संयम ठेवा
गुंतवणूक ही एक दीर्घकालीन रणनीती आहे हे समजून घेणे आवश्यक आहे आणि कोणताही गुंतवणूकदार कमी कालावधीत श्रीमंत झालेला नाही. यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी शेअर बाजारात दररोज चढ-उतार कसा होतो आणि गुंतवणुकीच्या मूल्यात काही अल्पमुदतीच्या बदलांची माहिती जाणून घेणे महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत यश संपादन करण्याची गुरुकिल्ली म्हणजे बाजारात चढ-उतार असताना देखील नेहमीच गुंतवणूक करत राहणे फायदेशीर ठरते. धीर धरण्याबरोबरच, एखाद्यानं स्मार्ट लक्ष्य देखील ठेवण्याची आवश्यकता आहे, कारण एखाद्याच्या गुंतवणुकीत आणि बचत करण्याच्या प्रक्रियांमध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. ध्येय ठेवल्यास गुंतवणूकदाराचे लक्ष केंद्रित राहू शकते आणि बाजारातील चढ-उतारात अडकणे टाळता येऊ शकते.
मदत मागण्यास अजिबात संकोच करू नका
पैशांच्या व्यवस्थापनाचा विचार केल्यास गुंतवणूकदारांनी व्यावसायिकांकडून मदत घ्यायला अजिबात संकोच करता कामा नये. जेव्हा एखाद्याला आपल्या आवश्यकतेनुसार गुंतवणूक करण्याची सर्वोत्तम रणनीती निश्चित करावी लागते, तेव्हा एखादा माणूस नेहमीच सल्लागार नियुक्त करू शकतो. वेगवेगळ्या गुंतवणुकीची माहिती कधी तरी एकाच वेळी खूप गोंधळात टाकणारी असू शकते. जर गुंतवणूकदारांना मदतीची आवश्यकता असेल तर असे अनेक वित्तीय तज्ज्ञ आहेत जे मदत करण्यास तयार असतात. यात व्यावसायिकांकडून बाजाराविषयी मते घेणे, अकाऊंटंट बरोबर कर नियोजनासंदर्भात चर्चा करणे आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापन आदी गोष्टींचा समावेश असतो. या सर्वांमुळे केवळ वेळेची बचत होणार नाही तर दीर्घ मुदतीसाठी देखील ते फायदेशीर ठरणार आहे.
कधीही भावनिक होऊ नका
एक चांगले गुंतवणूकदार कसे व्हाल? हा अनेकांचा प्रश्न आहे. बरेच गुंतवणूकदार सहसा भावनिक होतात आणि त्यांच्या गुंतवणुकीमध्ये घट होण्याचे हे मुख्य कारणांपैकी एक आहे. आपण एक चांगला गुंतवणूकदार होऊ इच्छित असल्यास भावना बाजूला ठेवणे महत्त्वाचे आहे. स्मार्ट गुंतवणूकदार घाईघाईने निर्णय घेत नाहीत आणि बहुतेक वेळा आपले पैसे जिथे असतात तिथेच सोडतात. याचे कारण त्यांना त्यांच्या गुंतवणुकीच्या धोरणाबद्दल विश्वास आहे. एखाद्याला दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी त्यांच्या धोरणांच्या अंमलबजावणीवर नेहमीच लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आणि बाजारामधील कोणत्याही अल्प-मुदतीच्या चढ-उतारांमुळे लक्ष वळविण्यापासून दूर राहावे.
नेहमीच जिज्ञासू राहा
यशस्वी गुंतवणूकदारांना नेहमीच हे माहीत असते की, त्यांचे पैसे कोठे गुंतवले जातात आणि बाजारातील चढ-उतार पोर्टफोलिओवर कसा परिणाम करतात. आपण सल्लागार नियुक्त केला असेल तर गुंतवणूक करण्यापूर्वी असंख्य प्रश्न विचारण्यास अजिबात संकोच करू नका. एक गुंतवणूकदार म्हणून, ते विशिष्ट गुंतवणूक करण्यापूर्वी समाविष्ट असलेले जोखीम समजणे आणि त्यांचे विश्लेषण करणे महत्वाचे आहे. नेहमीच एक योजना ठेवा. आपल्या सल्लागाराची मदत घेऊन नेहमीच एक आर्थिक योजना तयार केली पाहिजे. याचा उपयोग रोड-मॅप म्हणून केला जाऊ शकतो, जो आपल्या आर्थिक योजना तयार करण्यात मदत करेल आणि आपण ठरवलेल्या उद्दिष्टांपर्यंत कसे पोहोचाल याची आवश्यक माहिती देखील देईल. तसेच, जेव्हा तुमची आर्थिक योजना कालबाह्य होते, तेव्हा योजना अपडेट करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपण आपली दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ट्रॅकवर राहाल.
शिस्तबद्ध दृष्टिकोन पाळा
आपल्या पैशांसह यश मिळवणे ही एक वेळखाऊ प्रक्रिया आहे. वेळोवेळी गुंतवणूक केल्यास एखादी व्यक्ती अधिक बचत करू शकते. गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये नेहमीच नियमित योगदान देण्याची योजना करा. एखाद्याला विविधीकरणाला महत्त्व देणेदेखील आवश्यक आहे. केवळ तीन किंवा चार कंपन्यांमध्ये पैसे गुंतविल्यास एखाद्याला गुंतवणुकीसह यश मिळवता येत नाही. यशस्वी होण्यासाठी निधीचे वेगवेगळ्या विभागांमध्ये हुशारीने वाटप करणे महत्त्वाचे आहे, कारण यामुळे जोखीम कमी करण्यास मदत होते आणि तुमच्या गुंतवणुकीत यशस्वी होण्याची शक्यताही वाढते. गुंतवणूक ही एक सतत प्रक्रिया आहे जी एखाद्याची आर्थिक उद्दिष्टे मिळविण्यास मदत करते. यशस्वी रणनीती लागू करून एखादी व्यक्ती संपत्ती तयार करू शकते आणि निर्धारित आर्थिक उद्दिष्टांवर पोहोचू शकते. आपल्या गुंतवणुकीसह यश मिळविण्यासाठी वर नमूद केलेल्या सवयी तयार करा.
(एमडी अँड सीईओ, ब्रोकिंग & डिस्ट्रिब्युशन, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड)
हेही वाचा
चीनविरोधात जगभरात रोष; भारतासाठी हीच सुवर्णसंधी- नितीन गडकरी
लेहपासून 250 किमी अंतरावर चीनकडून भूमिगत 24 क्षेपणास्त्रे तैनात; भारताची चिंता वाढवणारा खुलासा
चीनमध्ये नव्या संकटानं पसरली भीती; 3.8 कोटी लोक प्रभावित, 140 जणांचा मृत्यू
अंबानींच्या RILनं रचला इतिहास; 12 लाख कोटींचं बाजार भांडवल जमवणारी देशातील पहिली कंपनी