credit card : क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोन या दोन्हीचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. तुमच्या गरजेनुसार आणि आर्थिक परिस्थितीनुसार यापैकी कोणतं फायद्याचं आहे हे ठरतं. आर्थिक आणीबाणीच्या काळात क्रेडिट कार्ड हे एखाद्या देवदुतासारखं झालं आहे. यात तुम्हाला कोणत्याही खर्चाशिवाय मोठी रक्कम वापरायला मिळते. महिन्याच्या शेवटी तुम्ही पैसे भरले तर तुम्हाला अधिकचा एक रुपयाही द्यावा लागत नाही, इतकं सोपं गणित आहे. दुसरीकडे, जर तुम्ही वैयक्तिक कर्ज घेतले तर त्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बँकेकडून ते मिळण्यास थोडा वेळ लागतो. मग तुम्ही दरमहा निश्चित ईएमआय देऊन पैसे परत करू शकता. अशा परिस्थितीत, तुमच्यासाठी चांगला पर्याय कोणता? हे कसं ठरवायचं?
कोणतं कर्ज चांगलं?
तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे कर्ज घ्या किंवा वैयक्तिक कर्ज, दोन्हीही असुरक्षित कर्जाच्या श्रेणीत येतात. याचा अर्थ असा की जर तुम्हाला असुरक्षित कर्ज हवे असेल, तर तुम्ही दोन्ही श्रेणींमधून कर्ज घेऊनच तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवू शकाल. दुसरी गोष्ट म्हणजे छोट्या खर्चासाठी, वैयक्तिक कर्जाऐवजी क्रेडिट कार्ड हा सर्वोत्तम पर्याय आहे. पण जर मोठा खर्च असेल तर त्यासाठी वैयक्तिक कर्ज हा एक चांगला पर्याय असू शकतो.
आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की प्रत्येक बँक त्यांच्या क्रेडिट कार्डवर वेगवेगळे पॉइंट्स आणि शुल्क आकारते. अशा परिस्थितीत, तुमच्यासाठी कोणता पर्याय चांगला आहे हे तुम्हाला स्वतःच ठरवावे लागेल.
वाचा - जन्मताच पैसे कमवायला सुरुवात! वर्षात ११ कोटींची कमाई; १७ महिन्यांचे बाळ २१४ कोटींचे मालक
तुलना करुन निर्णय घ्या
दोन्हीचे स्वतःचे वेगवेगळे फायदे आहेत. जसं की क्रेडिट कार्डद्वारे खर्च केल्याने तुम्हाला रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात. यामध्ये क्रेडिट कार्डवर कॅशबॅक देखील दिला जातो. ऑनलाईन शॉपिंग, चित्रपटाची तिकडे, इंधन अशा अनेक गोष्टींवर तुम्हाला सूट मिळते. पण, जेव्हा मोठ्या खर्चाची गरज असते, तेव्हा वैयक्तिक कर्ज हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. जिथे तुम्हाला निश्चित व्याजदराने परतफेड करण्यासाठी वेळ मिळतो. तुमच्या परिस्थितीचा विचार करून आणि दोन्ही पर्यायांची तुलना करून तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. गरज वाटल्यास आर्थिक सल्लागाराची मदत घेणे देखील उपयुक्त ठरू शकते.